ठाणे -कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 38 नवे रुग्ण आढळून आले आहेत. डोंबिवली आजदे परिसरातील 78 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. यापूर्वी कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आत्ता एकूण मृतांची संख्या 12 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये 11 महिन्याच्या बालिकाचा समावेश आहे, नवे रुग्ण धरुन कोरोना रुग्णांची एकूण संख्या 568 झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीत आज आढळून आलेल्या नव्या 38 रुग्णांपैकी कल्याण पूर्वेत 5 जणांना, कल्याण पश्चिमेत 7 जणांना, डोंबिवली पूर्वेत 11 जणांना, डोंबिवली पश्चिमेत 9 जणांना, मोहने आंबिवली परिसरात 3 जणांना, टिटवाळा परिसरात 2 जणांना आणि पिसवली परिसरात एक जणास कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका 11 महिन्याच्या मुलास कोरोना झाला आहे. तो आंबिवली परिसरात राहणारा आहे. आत्तार्पयत एकूण उपचार घेत असलेल्या 214 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 342 आहे. कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आलेल्या रुग्णांची संख्या 252 आहे. 119 जणांचे स्वॅब घेतले आहेत. त्यापैकी 85 जण हे खाजगी व 34 सरकारी रुग्णालयातील आहेत. स्वॅब घेतल्यानंतर 197 जणांचा टेस्टींग अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. ताप दवाखान्यात उपचार घेत असलेल्यांची संख्या 273 आहे. महापालिका क्षेत्रत आजमितीस अक्टीव्ह कंटेनमेंट झोन 112 आहेत. महापालिकेने 1 लाख 23 हजार 650 घरांचे सर्वेक्षण केले आहे. आत्तार्पयत 4 लाख 43 हजार 317 जणांचे सव्रेक्षण करण्यात आले आहे. उपचारांती बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 37.67 टक्के आहे.