डोंबिवली: रोकड लुटण्याच्या घटनांमध्ये कल्याण-डोंबिवलीत सातत्य दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्यात डोंबिवली मानपाडा रोडवरील जनलक्ष्मी फायनान्सची १८ लाखांची रोकड, त्या पाठोपाठ नोव्हेंबरमध्ये दोन बँकांना कॅश पुरवण्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांच्या टोळीतील दोघांना टिळकनगर पोलिसांनी केले जेरबंद, पण अद्यापही त्यातले तिघे आरोपि फरार आहेत. तर गेल्या आठवड्यात कल्याणमधील खडकडपाडा परिसरात भिवंडीतील एका इसमाकडील सुमारे ९ लाख रुपयांची रोकडलुटल्याची घटना घडली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत रोकड लुटणारी टोळी सक्रिय असून त्या टोळीचा पर्दाफाश करणे हे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.नोव्हेंबर मध्ये टिळकनगर पोलिस ठाण्याच्याहद्दीतील दोन बँकांना रोकड पुरवणा-या कॅशव्हॅनवर दरोडा टाकण्याच्या तयारीने आलेल्या पाच जणांच्या सशस्त्र टोळीपैकी दोघांना पोलिसांनी जेरबंद केले, पण त्यांच्या अन्य तीन सहका-यांचा सुगावा लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी अद्यापपर्यंत सुमारे ७० लॉज शोधले. तसेच संबंधितांच्या मोबाईलचे लोकेशन देखिल ट्रेस होते, पण त्या ठिकाणी पोलिस यंत्रणा पोहोचण्याच्या आधीच फोन स्विच्चआॅफ केला जातो. पोलिस त्यांच्या मागावर असल्याचे त्या टोळीलादेखिल माहिती झाल्यानेच ते नाचवत असल्याचे सांगण्यात आले. मोबाइल फोनचा मागोवा घेत तपासाच्या पथकांनी पुणे, वडगाव, नवी मुंबई, खारघर आदी सर्व ठिकाणी पथके पाठवली. सकाळी साडेदहा ते दुपारी तीन पर्यंत लोकेशन दाखवण्यात येते, पण त्यानंतर फोन बंद केला जातो, लोकेशन मिळत नसल्याने कार्यवाहीत अडथळे येतात. अशी टोळी जरी सक्रिय असली तरी तपास नक्की लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त करत आहेत. आॅगस्ट महिन्यापासून ठरावीक दिवसांच्या अंतरावर अशा घटना घडल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दोन गुन्ह्यांमध्ये २५ लाखांची रोकड लुटली आहे, तर टिळकनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना होता होता टळली आहे. ज्या घटना घडल्या त्यानूसार टोळीच सक्रिय असल्याचेही पोलिसांनी सांगितले. एकंदरितच बँकांना कॅश पुरवणा-या व्हॅन, मोठ्या रक्कमांची देवाण-घेवाण करणारे नागरिक, फायनान्स कंपन्या आदी लक्ष्य असल्याचे स्पष्ट असल्याचेही सांगण्यात आले. एकामागोमाग एक घडलेल्या अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा मोठया प्रमाणात कार्यरत आहेत. ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनेही समांतर तपास सुरु केला असल्याचेही सांगण्यात आले.'' डोंबिवलीत मानपाडा रोडवरील जनलक्ष्मी फायनान्सची सुमारे १८ लाखांची रोकड आॅगस्ट महिन्यात घडली होती. त्या गुन्ह्याचा तपास अद्यापर्यंत लागलेला नाही. त्याचाही तपास सुरु असून धागेदोरे मिळत नसल्याचे स्पष्टीकरण तपासाधिकारी नारायण देशमुख यांनी दिले.'''' गेल्या आठवड्यात भिवंडीतील इसमाची ९ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली, त्याचीही तपासणी सुरु असून ज्यांची रोकड गेली, ती पिशवी, सीसी फुटेज आदी माध्यमाने तपास सुरु आहे, पण अद्यापतरी काही लागले नसल्याचे या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळासाहेब कदम यांनी सांगितले.''
कल्याण-डोंबिवलीत रोकड लुटणारी टोळी सतर्क : पोलिस यंत्रणा हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 4:07 PM
आॅगस्ट महिन्यात डोंबिवली मानपाडा रोडवरील जनलक्ष्मी फायनान्सची १८ लाखांची रोकड, त्या पाठोपाठ नोव्हेंबरमध्ये दोन बँकांना कॅश पुरवण्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांच्या टोळीतील दोघांना टिळकनगर पोलिसांनी केले जेरबंद, पण अद्यापही त्यातले तिघे आरोपि फरार आहेत. तर गेल्या आठवड्यात कल्याणमधील खडकडपाडा परिसरात भिवंडीतील एका इसमाकडील सुमारे ९ लाख रुपयांची रोकडलुटल्याची घटना घडली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत रोकड लुटणारी टोळी सक्रिय असून त्या टोळीचा पर्दाफाश करणे हे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.
ठळक मुद्देपाच महिन्यात २७ लाख चोेरले पुणे, वडगाव, नवी मुंबई, खारघर परिसरातील ७० लॉजची पाहणी