डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरिवाला हटाव पथकाने बळजबरीने कारवाई केल्याच्या निषेधार्थ डोंबिवली पश्चिमेकडील फेरीवाले एकत्र आले. त्यांनी महापालिका कर्मचा-यांच्या मनमानी विरोधात एकत्र येत त्या पथकातील बुवा भंडारीसह तिघांवर कारवाई करण्याची मागणी करत विष्णूनगर पोलिस ठाण्यात ठाण मांडल्याची घटना सोमवारी रात्री घडली.फेरीवाले शंकर लाल यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, फेरीवाल्यांवर महापालिका कर्मचा-यांनी सोमवारी कारवाई केली, त्यावेळी डोक्यावर केळयाची टोपली घेवून जाणा-या एका महिलेची टोपली देखिल खेचण्यात आली. त्या झटापटीत ती खाली पडली, त्या महिलेच्या गुडघ्याला मार लागला. या बळजबरी आणि मनमानीचा निषेध करत फेरीवाले एकवटले. त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत ठाण मांडले. दरम्यान पोलिसांनी फेरीवाल्यांचे म्हणणे ऐकून घेत चर्चा केल्याचे शंकर यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कारवाईविरोधात फेरीवाले एकवटले, विष्णूनगर पोलीस ठाण्यात जमाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 9:22 PM