डोंबिवली : लिफ्टमध्ये वापरण्यात येणारा ॲलिमेक ॲटोमॅटिक लॉजिक कन्ट्रोलर चोरीला गेल्याची घटना पलावा २ मधील एलाइट बिल्डिंगमध्ये २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------
दोन मुले बेपत्ता
कल्याण : पूर्वेतील नेतिवली नाका परिसरातील शेख चाळीत राहणारे गुलशन खान (वय १०)आणि रिफत खान (वय ८) ही दोन लहान मुले बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली. गार्डनमध्ये खेळायला जातो असे सांगून ते घरी आलेच नाहीत. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
----------------------------------
मास्क कारवाई करताना पथकाशी हुज्जत
कल्याण : पूर्वेतील चक्कीनाका येथे मास्क न वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसी आणि पोलिसांच्या पथकाची कारवाई सुरू असताना दुचाकीवरून विनामास्क आलेल्या अमित पारेकर आणि अमृता सोनावणे यांना अडवण्यात आले. यावेळी दोघांकडून पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हुज्जत घालून कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------
मारहाण आणि चाकूचे वार
कल्याण : शाब्दिक बाचाबाची आणि भांडणाच्या झालेल्या वादातून प्रभाकर पटेकर, सुनीता पटेकर, आकाश पटेकर, किरण शेळके यांनी अरविंद मनोहर यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या पाठीवर आणि मांडीवर चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------------------------------
मुलगा बेपत्ता
कल्याण : पश्चिमेतील शहाड परिसरातील दीपज्योती अपार्टमेंटमध्ये राहणारा श्रीकृष्ण ऊर्फ रुद्र आनंत तिवारी हा १५ वर्षीय मुलगा बिल्डिंगच्या पाठीमागील खेळत असताना तो बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------