डोंबिवली : कोरोना महामारीत आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या विष्णूनगर आणि रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोफत कोरोना प्रतिबंधक किटचे राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली शहर विधानसभा क्षेत्र माजी कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या वतीने शनिवारी वाटप करण्यात आले. यात माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
------------------------------------------
फलक लावावेत
डोंबिवली : कोरोना रुग्णांची बेडअभावी परवड होत असून केडीएमसीच्या कोविड रुग्णालयांमध्ये किती बेड खाली आहेत व किती बेड भरलेले आहेत अशा सूचनांचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी ॲड. महेश काळे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
-------------------------------------------
एक हजार ४८४ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत रविवारी कोरोनाचे एक हजार ३२६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक हजार ४८४ रुग्णांना उपचाराअंती बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या १५ हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी कल्याण पूर्वेत २६१, डोंबिवली पूर्वेत ३९०, कल्याण पश्चिमेत ३८९, डोंबिवली पश्चिमेला १८६, मांडा-टिटवाळा ७९, मोहना १८ तर पिसवलीत ३ नवे रुग्ण आढळले आहेत.
-----------------------------------------------