कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हे बुधवारी निवडणुकीच्या दिवशी माघार घेतील, अशी माहिती दोन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी दिली. दोन्ही पक्षांनी सोमवारी त्यांच्या नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. त्यामुळे महापौरपदाच्या उमेदवार विनीता राणे आणि उपमहापौर म्हणून उपेक्षा भोईर यांच्या बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता राहिली आहे.महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ९ मे रोजी होणार आहे. त्यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. महापौरपदासाठी शिवसेनेकडून राणे आणि उपमहापौरपदासाठी भाजपाच्या भोईर यांनी एकत्रित आपापले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव संजय जाधव यांना सादर केले होते. परंतु, तानकी यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उपमहापौरपदासाठी भाजपाकडून अर्ज भरलेल्या भोईर यांनी महापौरपदासाठी देखील अर्ज भरला. परंतु, भोईर आणि तानकी हे दोघेही आपला अर्ज मागे घेतील, असे शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी रविवारीच स्पष्ट केले होते. तर आता भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनीही निवडणूक बिनविरोध होईल, अशी माहिती दिली आहे. या दोन्ही गटनेत्यांनी पक्षातील नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. त्यानुसार महापौरपदासाठी राणे तर उपमहापौपदासाठी भोईर यांना मत देण्याचे आदेश दोन्ही पक्षांनी दिले आहेत.राजीनाम्याची अफवायंदा टर्म असूनही महापौरपद शिवसेनेला बहाल केल्याने नाराज झालेल्या भाजपा नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी आपले राजीनामे पक्षाकडे दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.अखेर यासंदर्भात भाजपा गटनेते पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजीनाम्याचे वृत्त खोटे असल्याची माहिती दिली. त्यामुळे राजीनाम्याची ती पोस्ट अफवा ठरली.दुसरीकडे भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनीही पक्षातील नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार राणे आणि भाजपाच्या उपमहापौरपदाच्या उमेदवार भोईर यांना आपले मत हात वर करून नोंदवायचे आहे, असे आदेश काढल्याचे पाटील यांनी सांगितले.असा आहे पक्षादेश...महापौरपदासाठी बुधवारी दुपारी १२ वाजता होणाºया निवडणुकीच्या वेळी शिवसेना आघाडी गट व भाजपा युतीच्या अधिकृत उमेदवार राणे तर उपमहापौरपदासाच्या अधिकृत उमेदवार भोईर यांना आपला मत हात वर करून मत नोंदवायचे आहे, असा व्हीप शिवसेना नगरसेवकांसाठी काढला आहे, अशी माहिती गटनेते रमेश जाधव यांनी दिली. निवडणूक १२ वाजता असली तरी सेनेच्या सर्व नगरसेवकांनी सकाळी ११ वाजता महापौर कार्यालयात उपस्थित राहावे असा आदेशही जाधव यांनी दिला.
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर निवडणूक शिवसेना, भाजपाने काढला व्हिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 6:35 AM