कल्याण : किराणा मालासाठीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी सरकारने उठवल्याने प्लास्टिकबंदीचा बोºया वाजल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू आहे. तर, प्लास्टिक संकलन केंद्रांकडेही नागरिकांनी पाठ फिरवली आहे.प्लास्टिक बाळगणे आणि त्याचा साठा करणाºयांवर केडीएमसीतर्फे दंडात्मक कारवाई सुरू आहे. असे असतानाही एपीएमसीतील फुल बाजार, भाजी मार्केट आदी ठिकाणचे विक्रेते ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच माल देत आहेत.नागरिकांकडील प्लास्टिक गोळा करण्यासाठी केडीएमसीने नऊ ठिकाणी संकलन केंद्रे सुरू केली आहेत. परंतु, आधारवाडी अग्निशमन दलाशेजारील, सुभाष मैदानाजवळील संकलन केंद्रवगळता कोणतीही केंद्रे सुरू नव्हती. ही केंद्रे दररोज सकाळी १० ते दुपारी १ व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे सांगण्यात आले होते. परंतु, सोमवारी सकाळी ११ ते १२ दरम्यान कल्याण आधारवाडीतील मुख्य संकलन केंद्राला भेट दिली असता ते बंद होते, तर डोंबिवली सूतिकागृह येथील केंद्रावर केवळ प्लास्टिक संकलन करणारे वाहन होते, पण कर्मचारी दिसले नाहीत. कल्याण पूर्वेकडील ‘ड’ प्रभागातील संकलन केंद्राला फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे समजते. पूर्वेकडील भागासाठी हे एकमेव केंद्र असताना २ जुलैपासून आतापर्यंत केवळ १५ किलो प्लास्टिक जमा झाल्याची माहिती मिळाली.केंद्र सुरू असल्याचा दावाआधारवाडीतील संकलन केंद्र बंद असल्याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी प्लास्टिकबंदीची कारवाई व संकलन केंद्रेही चालू असल्याचे सांगितले. आणखी केंद्रे उघडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीत प्लास्टिकबंदीचा वाजला बोऱ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 3:51 AM