- मुरलीधर भवार कल्याण - कल्याण पूर्वेत कोळसेवाडी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकत अंमली पदार्थाच्या सेवन करणाऱ््या आठ तरुणांना ताब्यात घेतले आहे. तर गांजा पुरविणारा नानिकराम मंगलानी याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गांजा सेवन करताना अटक करण्यात आलेले तरुण हे चांगल्या ठिकाणी काम करणारे आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एक जण बीटेक शिक्षक आहे.
शहरात गांजाची तस्करी सुरु असल्याची बाब लक्षात आल्यानंतर याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात हेाती. काही दिवसापासून पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलिस ठाण्याच्या स्तरावर अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी या पूर्वी अनेक लोकांना अटकही करण्यात आली आहे. मात्र गांजा सेवन करणाऱ््यांची संख्या वाढल्याने पालक, नागरीक आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. काही दिवसापूर्वी कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये सर्व पक्षीय नागरीकांनी मोर्चा काढला होता.
अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र करावी अशी मागणी केली होती. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे एक पथक कल्याण पूर्वेतील ठिकठिकाणी दाखल झाले. गांजा तस्करी करणाऱ््या ८ तरुणांना ताब्यात घेतले. हे तरुण शिक्षित आणि चांगल्या ठिकाणी काम करणारे आहेत. त्यापैकी एक बीटेक शिक्षक आहे. या तरुणांना गांजा पुरविणाऱ््या नानिकराम मंगलानी याला पोलिसांनी अटक केली आहे. तो खडेगोळवली परिसरात राहताे. तो अनेक ठिकाणी गांजा पुरवितो. तो कुठून गांजा मागवितो. तो कोणाला विकतो याचा तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.