शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
6
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
7
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
8
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
9
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
10
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
11
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
12
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
13
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
14
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
15
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
16
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
17
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
18
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
19
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
20
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा

Kalyan: कसारा मार्गावर उंबरमाळी मध्ये मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लांबपल्याच्या गाड्या रखडल्या

By अनिकेत घमंडी | Published: September 26, 2023 12:34 PM

Central Railway: मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील उंबरमाळी थांब्यादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.२० वाजता घडली.त्यामुळे आसनगाव कसारा खर्डी मार्गावरील अप दिशेकडील रेल्वे वाहतूक खोळंबली.

- अनिकेत घमंडी

डोंबिवली - मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील उंबरमाळी थांब्यादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.२० वाजता घडली.त्यामुळे आसनगाव कसारा खर्डी मार्गावरील अप दिशेकडील रेल्वे वाहतूक खोळंबली. दरम्यान, दुपारी १२.५५ दरम्यान ती समस्या सोडवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले, मात्र त्या घटनेमुळे दोन तास कसारा आसनगाव मार्ग बंद होता. दुपारी १.१० नंतर हळुहळु वाहतूक पूर्वपदावर आली.

त्याचा फटका एक कसारा सीएसटी, भुवनेश्वर एक्स्प्रेस, धुळे दादर या तीन गाड्यांना बसला. त्यामध्ये हजारो प्रवासी गाडीत ताटकळले. पाऊस नाही पण आभाळ असल्याने वातावरणात उकाडा असल्याने गाडीत स्लीपर क्लास, सेकंड क्लासमध्ये बसलेल्या प्रवाशांना गर्मी,उकड्यल्याने अधिक त्रास झाला. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार डाऊन मार्गवरून एक इंजिन आल्यानंतर मालगाडीला ते।जोडले जाईल आणि त्यानंतर तो मार्ग सुरळीत।होईल, तोपर्यंत मात्र वाट बघण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रवासी हैराण झाले होते.

गणेशोत्सव दरम्यान राज्यात, देशात इतरत्र गेलेले प्रवासी पुन्हा मुंबईकडे परतत असून अपच्या गाड्या फुल्ल असून त्यामध्ये असे तांत्रिक अडथळे आल्याने प्रवाशांचे अधिक हाल होत असल्याने पर्यायी व्यवस्थेची अधिक आवश्यकता असल्याचे प्रवाशांनी सांगितले. वर्षानुवर्षे ही समस्या ठिकठिकाणी कमी अधिक।प्रमाणात होते, तरीही रेल्वे प्रशासन सतर्क का होत नाही, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची ते दखल का घेत नाहीत असा नाराजीचा पण संतप्त सवाल प्रवाशांनी व्यक्त केला.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेthaneठाणेrailwayरेल्वे