कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचार काळात ठिकठिकाणी काढलेल्या रॅली तसेच वैयक्तिक गाठीभेटी यासह कल्याण पूर्वेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि डोंबिवलीत झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे.शिंदे हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. यंदाही त्यांनी अडीच लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत कल्याण मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान पुन्हा मिळवला आहे.यंदाच्या निवडणुकीच्या प्रचार काळात मतदारसंघात शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते शरद पवार आदी दिग्गजांच्या सभा झाल्या होत्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पार पडली. ही सभा डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील अप्पा दातार चौकात झाली होती.मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घेतलेले तोंडसुख तसेच युतीकडून केंद्रात आणि राज्यात सुरू असलेले विकासाचे प्रकल्प आदी मुद्द्यांवर त्यांनी जोरदार भाष्य केले होते.यावेळी झालेल्या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात तसेच शिट्या वाजून जमलेल्या श्रोत्यांनी दाद दिली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रभावी ठरलेले भाषण शिंदे यांच्या विजयात मोलाचे ठरल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्र्यांची सभामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला होता. विरोधकांकडे बोलायला वक्ते नसल्याने भाड्याने वक्ते घेतले जात आहेत. रेल्वेचे इंजीन असेच भाड्याने घेतले, अशी टीका केली.पवारांची सभा'पवारांच्या उल्हासनगर आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात दोन सभा झाल्या. या सभांना चांगला प्रतिसादही मिळाला; पण त्या सभा राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना तारू शकल्या नाहीत.उद्धव यांची सभाकल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. यावेळी शिवसेनेतून मनसेत गेलेले शरद गंभीरराव व अन्य काहींनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.
कल्याण लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उद्धव, फडणवीसांच्या सभांचा शिंदेंना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 3:27 AM