शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

कल्याण-मुरबाड रेल्वेचे घोडे सर्वेक्षणावरच अडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:08 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले.

- मुरलीधर भवारकल्याण  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले. या घोषणेला दोन वर्षे उलटूनही आतापर्यंत केवळ प्राथमिक सर्वेक्षणच झाले आहे. त्यापुढे केंद्र सरकारकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने या मार्गाचे घोडे पुढे सरकणार तरी कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.कल्याण-नगर हा मार्ग ब्रिटिशांच्या काळापासून रखडलेला आहे. त्याच्या मागणीसाठी १९९६ पासून रेटा सुरू आहे. हा मार्ग रखडल्याने कल्याणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले मुरबाड हे रेल्वेशी जोडले गेले नाही. मुरबाडमध्ये नागरीकरण वाढत असून शहराला नगरपंचायतीचा दर्जा आहे. त्यामुळे रेल्वे आवश्यक असून त्याचा फायदा शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांना होईल.कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाने २०११ साली केली होती. ४ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी या मार्गाची घोषणा केली होती. भाजपा आमदार किसन कथोरे यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. कल्याण-नगरमार्गासह कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. रेल्वेमार्गाची आखणी, स्थानके, त्यासाठीचा खर्च याविषयी अद्याप काहीच स्पष्टता नाही. प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार केला असला, तरी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा उपयुक्तता अहवाल प्रतिकूल असल्याची माहिती समोर येत आहे.प्राथमिक अहवालाला रेल्वे प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर तो रेल्वे बोर्डाच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर हे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे सोपवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. या मार्गावर लहानमोठे पूल, एक बोगदा आणि तीन स्थानके प्रस्तावित आहेत. कांबा-वरप, गोवेलीनाका आणि त्यानंतर मुरबाड रेल्वेस्थानक असेल, असा ढोबळ अंदाज असल्याची माहिती उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे. कल्याण-नगर हा रेल्वेमार्ग खाजगीकरणातून पूर्ण होऊ शकतो, अशी भूमिका दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी २००६ मध्ये मांडली होती.कल्याण-नाशिक लोकलसेवा लवकरच सुरू होणार आहे. या मार्गावर असलेल्या कसारा घाटात लोकलचे डबे कसे चढणार, असा तांत्रिक प्रश्न उपस्थित करून ही सेवा सुरू होणे कठीण असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी विशिष्ट गाड्या तयार करून या अडचणीवर मात करण्यात आली असून त्या धावण्यासाठी सज्ज आहेत. कल्याण-नाशिक लोकलचा खडतर मार्ग प्रत्यक्षात येत असताना कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गही पूर्ण करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.३५० कोटींची लागणार तरतूद : रेल्वे प्रवासी संघटनेला माहितीच्या अधिकारामध्ये कल्याण-नगर रेल्वेमार्गासाठी पहिल्या टप्प्यात ७२१ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. हा खर्च गृहीत धरल्यास कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची प्राथमिक तरतूद करावी लागणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkalyanकल्याणmurbadमुरबाड