लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : निलंबित झालेले, पात्र नसलेल्या ग्रामसेवकाची उत्कृष्ठ ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाली. पण सर्व निकषपूर्ण करून उत्कृष्ठ कामगिरी करीत असतानाही पुरस्कारासाठी निवड झाली नसल्याचे कळताच कल्याण पंचायत समितीच्या नियंत्रणातील वाकळन ग्राम पंचायतीचे ग्राम सेवक रघूनाथ वामन हरड यांनी संताप व्यक्त करीत विष प्राशन आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे ३ नोव्हेंबर रोजी होणारा हा पुरस्कार वितरण समारंभ रद्द केल्याच्या वृत्तास ठाणेजिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. वाय. जाधव यांनी दुजोरा दिला.उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामसेवकांना येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाव्दारे उत्कृष्ठ ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येथे. त्यासाठी सर्व निकषपूर्ण करीत उत्कृष्ठ कामगिरी असतनाही हरड यांची निवड झाली नाही. यासाठी त्यांनी कार्यालयात वादही घातल्याचे ऐकायला मिळत आहे. या मनस्तापातून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा हरड यांच्या गावासह जिल्ह्यातील ग्रामसेवकांमधी ऐकायला मिळत आहे. यास अनुसरून ग्राम सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय शेळके यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी देखील या वृत्तास दुजोरा दिला. या आत्महत्ये मागे त्यांच्या परिवारातील वादही कारणीभूत असण्याची शक्यता शेळके यांनी व्यक्त केली.मुरबाड तालुक्यातील सरळगांवजवळी डांगुर्ले येथील हरड मुळचे रहिवाशी आहे. ऐन दिवाळीत त्यांच्या या आकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला पुरस्कार वितरण समारंभही जिल्हा परिषदेकडून रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी अन्य योजनेच्या आढाव्यासह मार्गदर्शनासाठी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील ग्राम सेवकांची बैठक घेतली जाणार आहे. या आत्महत्ये विषयीचे मुळकारण जिल्हा परिषद प्रशासनाने शोधून दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील सध्या जोरधरू लागली आहे.
पुरस्कार मिळणार नसल्यामुळे कल्याण पंचायत समितीच्या ग्राम सेवकाची आत्महत्या ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 7:40 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निलंबित झालेले, पात्र नसलेल्या ग्रामसेवकाची उत्कृष्ठ ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाली. पण सर्व निकषपूर्ण करून ...
ठळक मुद्दे* पुरस्कार वितरण सोहळा रद्दनिलंबित झालेले, पात्र नसलेल्या ग्रामसेवकाची उत्कृष्ठ ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवडनिकषपूर्ण करून उत्कृष्ठ कामगिरी करीत असतानाही पुरस्कारासाठी निवड झाली नसल्याचे कळताच