कल्याणमध्ये उन्नाव घटनेचा कॉंग्रेसकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 08:32 PM2019-07-31T20:32:31+5:302019-07-31T20:33:59+5:30
यावेळी आंदोलनकर्त्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले.
कल्याण : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पीडितेला ठार मारण्याचा कट करणाऱ्या भाजपा आमदार कुलदीपसिंह सेंगर यालाच आता भाजपा सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ, या मोहिमेचा दूत नेमावा, अशी मागणी करत आज युवक काँग्रेसतर्फेकल्याणमध्ये निदर्शने करण्यात आली.
उन्नाव बलात्कार व हत्या प्रकरणात युवक काँग्रेसने पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी आणि योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल काटकर, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, काँग्रेसचे शैलेश तिवारी, विधानसभा अध्यक्ष मनीष देसले, विधानसभा उपाध्यक्ष धनंजय वर्मा, प्रशांत सिंह, लालचंद तिवारी, अनुपम त्रिपाठी, संदीप मौर्या, नसीम खान आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी आंदोलनकर्त्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरण या घटनेचे गांभीर्य ओळखून आतापर्यंत अनेक जणांनी या घटनेची निंदा केली आहे.