शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

खाजगी हॉस्पीटल मधील पेशन्ट आणि स्टॉफलाच केले पालिकेने क्वाँरन्टाईन, ४२ जणांना ठेवले देखरेखेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 3:57 PM

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णामुळे आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घोडबंदर भागातील संपूर्ण खाजगी हॉस्पीटलच क्वॉरन्टाइन केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विविध स्वरुपाचे उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या ९ रुग्णांचा देखील समावेश आहे.

ठाणे : एकीकडे कोपरीतील आनंद नगर भागातील ६२ नागरीकांना घोडबंदर भागातील कासारवडवली भागात क्वॉरन्टाईन केले असतांनाच, आता याच भागातील एका खाजगी रुग्णालयालाच पालिकेने क्वॉरन्टाइन केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये हॉस्पीटलचा ३३ जणांचा स्टाफ आणि त्याठिकाणी विविध उपचार घेण्यासाठी दाखल झालेले ९ रुग्ण अशा तब्बल ४२ जणांना क्वॉरन्टाइन करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या रुग्णालयात २३ मार्च पर्यंत एक रुग्ण हा उपचारासाठी दाखल होता, आता तो रुग्ण इतर रुग्णालयात उपचार घेत आहे. परंतु आता त्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझीटीव्ह आल्याने पालिकेने हे पाऊल उचलले आहे.                  आनंद नगर भागातील ६२ नागरीकांना कासारवडली येथे देखरेखाली ठेवले आहे. सध्या त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत. परंतु त्यांना १४ दिवस येथे ठेवले जाणार आहे. दुसरीकडे शहरातील कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. त्यानुसार खरबरादाची उपाय म्हणून पालिकेच्या माध्यमातून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. अशातच आता संपूर्ण खाजगी हॉस्पीटलच पालिकेने क्वॉरन्टाइन केल्याने नागरीकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे यातून दिसत आहे. सोमवारी वर्तक नगर येथील एका नागरीकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण परदेशवारी करुन आला होता. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने तो उपचारासाठी घोडबंदर भागातील खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. १८ मार्च ते २३ मार्च पर्यंत तो या रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर तो मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल झाला. दरम्यान सोमवारी त्याचा रिपोर्ट आला असून त्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.त्यानुसार सुरक्षिततेचा उपाय म्हणून पालिकेने घोडबंदर भागातील खाजगी हॉस्पीटलच क्वॉरन्टाइन केले आहे. या हॉस्पीटलमध्ये ३३ जणांचा स्टाफ असून येथे ९ रुग्ण विविध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. परंतु आता या सर्वांनाच हॉस्पीटलमध्येच क्वारन्टाइन करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. त्यांची तपासणी करण्यात येऊन पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या