कल्याण - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कल्याण ते स्वारगेट आणि स्वारगेट ते कल्याण अशी शिवशाही सेवा सुरू केली आहे.ही बस पहाटे पाच, साडेपाच, दुपारी साडेतीन आणि साडेचार वाजता कल्याणहून निघेल. ती डोंबिवली रेल्वे स्थानक, एमआयडीसी, पनवेल, मेगा हायवे, वाकड, चांदणी चौक मार्गे स्वारगेटला पोहोचेल. स्वारगेटहून परतीच्या प्रवासासाठी ती सकाळी साडेनऊ, साडेदहा, रात्री आठ आणि नऊ वाजता सुटेल, असे फलक एसटीने डोंबिवली आगारात लावले आहेत. खाजगी बस या प्रवासासाठी ४५० रूपये तिकीट आकारतात. पण शिवशाहीसाठी हेच तिकीट प्रौढांसाठी २६४, तर लहानग्यांसाठी १३८ रूपये आहे. या बस सुरू झाल्या असल्या, तरी एसटीने मात्र स्वत:हून त्याबाबत काहीही माहिती दिलेली नाही किंवा साधी जाहिरातही केलेली नाही.यापूर्वी प्रवाशांच्या आग्रहाखातर एसटीने कल्याण-स्वारगेटला बस सुरू केल्या. पण त्याची जाहिरात केली नाही. पुढे प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत त्या बंद करण्यात आल्या. त्यासाठी लोकमतने पाठपुरावा केला होता. त्याची दखल वेगवेगळ््या राजकीय पक्षांनी घेतली. नंतर मनसेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेत त्यांना शिवशाही सुरू करण्यासाठी पत्र दिले होते. पुढे शिवसेनेनेही हा विषय हाती घेतला होता.
कल्याण ते स्वारगेट शिवशाही बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:47 AM