ठाणे : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्र . ५ मधील भिवंडी ते कल्याण टप्प्यामधील आणि कल्याण-तळोजा मार्ग क्र . १२ चे आरेखन बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करा, असे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्र वारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. या पुनर्सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील हे मेट्रोमार्ग लांबणीवर पडणार आहेत. शिवाय, यामुळे सध्याच्या बहुतांशी समस्यांना पूर्णविराम मिळणार की, नव्याने काय समस्या उद्भवणार, याकडेही आता सर्वांचे लक्ष लागून आहे.ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रोमार्गापैकी ठाणे ते भिवंडी पट्ट्यातील कामाला सुरु वात झाली आहे. परंतु, भिवंडी ते कल्याण पट्ट्यातील मेट्रोमार्गाच्या आरेखनासंदर्भात अनेक तक्र ारी शेतकऱ्यांकडून येत असल्यामुळे त्याची दखल गांभीर्याने घेण्यात येत आहे. भिवंडी शहरातून जाणाºया मार्गिकेमुळे बाधित होणाºयांचे प्रमाण जास्त आहे. तसेच, शहरातील एक उड्डाणपूलही या मार्गिकेच्या आड येत आहे. त्यामुळे मार्गिकेचे आरेखन बदलण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. तिची दखल घेऊन तत्काळ आरेखनात बदल करण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.याचप्रमाणे, कल्याणच्या पश्चिम भागातून जाणारी मार्गिकाही दुर्गाडी येथून थेट एपीएमसी मार्केटला नेण्याऐवजी बिर्ला कॉलेज परिसरमार्गे फिरवल्यास कल्याण पश्चिमेचा बराचसा भाग मेट्रोमार्गाने जोडला जाईल. त्यामुळे येथील मार्गिकेतही बदल करण्याची मागणी सुरु वातीपासून होत होती. या मागणीचीही दखल घेऊन या मेट्रोच्या आधीच्या मार्गात बदल करण्यासाठी नव्याने आरेखन करण्याचे आदेश शिंदे यांनी या बैठकीत संबंधित अधिकाºयांना दिले आहे.कल्याण-डोंबिवली-तळोजामेट्रोविषयी तक्रारीकल्याण-डोंबिवली-तळोजा या मेट्रोमार्गाच्या आराखड्याविषयी अनेक तक्रारी आहेत. त्याकडे लक्ष केंद्रित करून फारशी लोकवस्ती नसलेल्या परिसरातून हा मार्ग नेण्यात आला आहे. या मार्गातून अतिवर्दळीचा भाग सोडण्यात आल्याच्या तक्र ारी करण्यात येत असल्याच्या मुद्यांवरदेखील या बैठकीत ऊहापोह करण्यात आला. त्यामुळे या मार्गाच्या आराखड्यातही बदल करण्याची गरज व्यक्त करून नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले. या बैठकीला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी आणि एमएमआरडीए व नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे-भिवंडी-कल्याणसह कल्याण-तळोजा मेट्रो लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 11:32 PM