डोंबिवली - शांतता कमिटी आणि पोलीस मित्र यांचा सत्कार, मोबाईल हस्तांतरण सोहळा डोंबिवलीत बुधवारी सम्पन्न झाला, त्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.प्रतापराव दिघावकर, पोलीस आप आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त अंकित गोयल, एसीपी रवींद्र वाडेकर, कांबळे, पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ, विजयसिंह पवार, गजानन काब्दुल्ले यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस मित्रामुळे पोलिसांना राष्ट्रीय पदक मिळते ही आनंदाची बाब असल्याचे मत दिघावकर यांनी व्यक्त केले.1 कोटींचे मोबाईल पोलिसांनी मिळवले असून त्याचे हस्तांतरण करण्यात येत आहे पोलीस आणि नागरिक दोघेही भाग्यवान आहेत. मोबाईल जीवनातला अविभाज्य घटक आहे, त्यामुळे तो शोधण्यासाठी पथक नेमले आहेत. केवळ मोबाईल चोरी थांबवणे हेच काम त्या पथकाने करायचे. काश्मीर, नेपाळ, दिल्ली येथून मोबाईल आणलेत. ज्याचें त्याचे मोबाईल आहेत त्यांनाच ते दिले जाणार. पोलीस मित्र हे समाजासाठी काम करतात. स्वाभिमान जगण्यासाठी आम्ही काम करतो. जनतेचा विश्वास जिंकणे हे महत्वाचे आहे. असे मत दिघावकर यांनी व्यक्त केली. स्वच्छता ठेवा असे आवाहन यावेळी दिघावकर यांनी केले. मंगळसूत्र चोरी 215 वरून 150 वर आले आहेत पण ते शून्यावर आना. जो मंगळसूत्र, चैन सँचिंग करेल त्याला मोक्का लावा, काही महिन्यात या गुन्ह्याखाली 6 जणांना मोक्का लावला. समाजविघातक काम करतात अशा 9 जणांना या झोन अंतर्गत तडीपार केलंय.पोलीस मित्र ठाणे जिल्ह्यात राबवले जात आहे, त्यामुळेच एक कोटी 15 लाखांचे मोबाईल आपण मिळवले असून त्याचे वाटप बुधवारी करण्यात आले. यारो जिओ वतन के वासते... असे सांगत पोलिसांनी नागरिकांना, पोलिसांना सलाम केला.
कल्याण झोन 3 पोलिसांनी परत केले 1 कोटी 15 लाखांचे मोबाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 8:07 PM