डोंबिवली : बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये कल्याण तालुक्याचा ८७.७३ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातून एकूण सहा हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सहा हजार १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४६२ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. डोंबिवलीतील साउथ इंडियन महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचा, होली एंजल्स स्कूलचा विज्ञान यांचा विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा, तर जन-गण-मन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.मंगळवारी सकाळपासूनच निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल जाहीर झाला. होली एजंल्स स्कूलचा सलग १३ व्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यालयाचा कला विभागाचा निकाल ७०.८३ टक्के, के.व्ही पेंढरकर महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ७३.३३ टक्के, विज्ञान विभागाचा ७८.२१ टक्के, वाणिज्य विभागाचा ९६.८८ टक्के लागला आहे. मॉडेल महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा ९३.४८ टक्के, कला विभागाचा ९७.५०, वाणिज्य विभागाचा ९८.६३ टक्के लागला आहे. प्रगती महाविद्यालयाचा कला ७२.८९, वाणिज्य ९४.४४, विज्ञान ८४.६१ टक्के लागला आहे. होली एंजल्स स्कूलच्या वाणिज्य शाखेच्या गीतिका नायर हिने ९२.३१ टक्के गुण मिळवून प्रथम, तर नेहा साळी ९२ टक्के, आणि नितू पाल हिने ९१.२० टक्के यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान विभागातून अस्मिता पाटील हिने ८५.६९ टक्के गुण मिळवून प्रथम, संघमित्रा रंगनाथन हिने ८२.१५ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि रोहित पाटील याने ८१.३८ टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. उम्मन डेव्हिड यांनी दिली आहे.कल्याणमधील के. एम. अग्रवाल यांचा विज्ञान विभागाचा ९२.५८ टक्के, कला विभागाचा ६५.१५ , वाणिज्य विभागाचा ९७.१४ टक्के निकाल लागला आहे. बिर्ला महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९५.२७ टक्के, कला शाखेचा ८२.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९९.४३ टक्के इतका लागला आहे.साकेत महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ७६.३१, कला७१.२९, वाणिज्य ८७.७८ टक्के लागला आहे.>मोफत शिकवणीतील विद्यार्थ्यांचे यशरा.स्व. संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या मोफत शिकवणी वर्गातील बारावीतील विद्यार्थ्यांनी नेहा पवार (विज्ञान शाखा) हिने ६६ टक्के गुण मिळविले आहेत. शिवानी सकपाळ (वाणिज्य शाखा) हिने ६३ टक्के गुण मिळविले आहेत. पुष्पलता कदम (वाणिज्य शाखा) ५७ टक्के गुण तर नम्रता बैकर (वाणिज्य शाखा) हिने ७० टक्के गुण मिळविले आहेत. वासुदेव जांभळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
कल्याणचा ८७.७३ टक्के निकाल, बारावीचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:53 AM