ठाणे : धर्मवीर आनंद दिघे साहेब क्रीडा मैदान उत्तरशिव, तालुका कल्याण या ठिकाणी झालेल्या ठाणे जिल्हा परिषद आयोजित दहिसर केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ शाळा सहभागी झाल्या होत्या. दिवसभरांमध्ये मुलांच्या अटीतटीच्या झालेल्या खेळांच्या सामन्यांमध्ये बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मुलांची लंगडी यामध्ये शाळेला प्रथम क्रमांक, तसेच मुलींची लंगडी यामध्ये प्रथम क्रमांक व संगीत खुर्ची यामध्ये शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
या केंद्र स्स्पतरीय स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील , केंद्रप्रमुख आत्माराम पागडे सर यांच्या उपस्थित पार पडल्या. या बामाल्ली शाळेच्या संघाना पुढे कल्याण तालुकास्तरीय स्पर्धेसाठी खेळावे लागेल. संगीत खुर्ची मध्ये काव्या भगवान गोंधळी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे गावाने फटाके फोडत दारोदार औक्षण करत मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
त्यामुळे परिसरातून पालकांकडून ग्रामस्थांकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक पंडित गायकवाड, शर्मिला गायकवाड यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुलांना प्रथम, द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी व प्रमाणपत्र या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. क्रीडा स्पर्धा अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात पार पडल्या.