शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

केडीएमसीत वाहते ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री!, तकलादू कायद्यांमुळे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:57 AM

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका विकासकामांऐवजी भ्रष्ट कर्मचारी आणि अधिका-यांच्या उपदव्यापामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.

प्रशांत माने कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका विकासकामांऐवजी भ्रष्ट कर्मचारी आणि अधिका-यांच्या उपदव्यापामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. आधीच २० हून अधिक लाचखोर अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात अडकले असताना आणखी दोघांना सोमवारी जेरबंद करण्यात आले. मागील सहा महिन्यांत विविध लाच प्रकरणांमध्ये चार जण अडकल्याने केडीएमसी एकप्रकारे ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.क्षुल्लक कारणांसाठी कर्मचाºयांची लाच मागण्याची प्रवृत्ती काही केल्या कमी होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी असे २३ जण लाचखोरीच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यानंतरही कर्मचाºयांची खाबुगिरी कमी झालेली नाही. स्वाती गरूड या महिला अधिकाºयाला जुलैमध्ये झालेल्या अटकेमुळे या प्रकरणात महिलाही मागे नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्याला काही महिने उलटत नाही तोच महापालिकेच्या ‘अ’ प्रभागातील कर विभागातील लिपिक श्रीधर रोकडे याला लाचखोरीच्या प्रकरणात नुकतीच अटक झाली. त्याच पुन्हा प्रभागातीलच आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे व कामगार विजय गायकवाड याला लाच प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यात अन्य आरोग्य निरीक्षक संजय धात्रक याचाही समावेश आहे. नालेसफाईच्या कंत्राटाची बिले देताना दोघा निरीक्षकांनी कंत्राटदाराकडे ६० हजारांची लाच मागितली. परंतु, तडजोडीअंती ४० हजार ठरले. त्यौपकी दोघांनी प्रत्येकी २० हजारांची मागणी केली होती. ही रक्कम घेताना ठाकरे याला अटक झाली. या प्रकारामुळे केडीएमसीतील कंत्राटदारांना वेठीस धरले जात असल्याचे सिद्ध झाले.मागील सहा महिन्यांत तिघेजण अडकल्याने पुन्हा पालिकेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या जाळ््यात अडकल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर याआधी घडल्या आहेत. दोन नगरसेवकही यात अटक झाले आहेत. लाचखोरांना कडक शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठिशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने होत असल्याची उदाहरणे याआधीही दिसली आहेत. या अभय देण्याच्या प्रवृत्तीमुळेच लाचखोरीच्या प्रकरणातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी सेवेत कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. याला लाचखोरीसंदर्भातील कायदेही एकप्रकारे तकलादू ठरत असल्याने अशा अधिकाºयांचे चांगलेच फावते. सेवेतील त्यांचा प्रवेश पुन्हा सुकर होत असल्याने ‘जाऊ तिथे खाऊ’ ही प्रवृत्ती कायम राहत आहे. वारंवार बदलणारे सरकारी निर्णय हे लाचखोरांच्या हिताचे असले तरी जिथे भ्रष्टाचाराला वाव आहे, अशा कार्यकारी पदांपासून लाचखोरांना दूर ठेवण्याच्या राज्य सरकारच्या २०११ च्या निर्देशाकडेही हेतुपुरस्सर कानाडोळा केला गेल्याचे केडीएमसीत पहावयास मिळत आहे.>अबतक पच्चीससोमवारची घटना पाहता आतापर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण २५ जण लाचखोरीच्या जाळ््यात अडकले गेले आहे. यात सुरेश पवार, सुनील जोशी, गणेश बोराडे, सुहास गुप्ते, दत्तात्रय मस्तुद, स्वाती गरूड या बड्या अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाचेच्या प्रकरणात अडकले गेल्यानंतरही लाचसत्र सुरूच आहे.न्यायालयातआज हजर करणारलाचखोर आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे आणि कामगार विजय गायकवाड या दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली. दोघांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्य एक आरोपी आरोग्य निरिक्षक संजय धात्रक यालाही लवकरच अटक करू, असे चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका