ठाणे : वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांच्या २०२० च्या पुस्तकामध्ये कराटेपटू रोहित भोरे यांची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी त्याचे अभिनंदन करुन भोरे यांना प्रमाणपत्र दिले आहे.
सन २०१८ व २०१९ वर्षा मध्ये पाच हजारपेक्षा अधिक बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी) मॅनिंग मोपिंग स्वच्छता कामगारांना फिटनेस, नैराश्य व चिंतामुक्त, नशा मुक्ती, सेल्फ डिफेन्स, योग्य आहार करीता दिलेले प्रशिक्षणसाठी त्याचबरोबर ८०० पेक्षा अधिक शालेय, महाविद्यालय मुलींना, अनाथ मुले, मुलींना मोफत कराटे मार्शल आर्ट या कलेचे प्रशिक्षण दिल्या बदल तसेच कराटे या क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट असे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, आशिया, विश्व् व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स करून महाराष्ट्र राज्याचे व भारत देशाचे नाव कराटे क्रीडा प्रकारात उंचावल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी २०२०च्या पुस्तकामध्ये रोहित भोरे यांच्या नावाची नोंद ही "कराटे एक्स्पर्ट" म्हणून केलेली आहे.