उल्हासनगर : केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील बारमालक विजय कोळीला अटक केली असून त्याच्याकडून २ पिस्तुलांसह जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त वसंत जाधव यांनी दिली.केबल कार्यालयात ११ सप्टेंबर रोजी खंडणीखोर सुरेश पुजारी याचा शूटर नितीन अवघडे याने भरदिवसा कारिरा यांची गोळ्या घालून हत्या केली होती. पाच कोटींची खंडणी दिली नसल्याने ती केल्याचे पुजारी याने पत्रकारांना फोन करून सांगितले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही दिवसांत शूटर नितीन अवघडे, विजय फाफडेसह टिपर कैलास प्रधान, सचिन लोंढे यांना अटक केली आहे. अवघडे याला सांगली जिल्ह्यातील रेणुका बारचा मालक विजय बाळासाहेब कोळी याने शस्त्र पुरविल्याचा संशय होता. पोलिसांनी बारची झाडाझडती घेतली असता २ पिस्तुले, ३ मॅग्झीनसह १६ जिवंत काडतुसे मिळाली आहेत.
कारिरा हत्या : सांगलीच्या बारमालकाला अटक
By admin | Published: October 27, 2015 12:20 AM