शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

कासकर थेट दाऊद, शकीलच्या संपर्कात, चारही आरोपी मकोका कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 06:35 IST

ठाणे : इक्बाल कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयासमोर बुधवारी केला.

ठाणे : इक्बाल कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयासमोर बुधवारी केला. आरोपीच्या मोबाइल फोनच्या तपशिलातून ही माहिती समोर आली असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले.एका बिल्डरकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज एजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना खंडणीविरोधी पथकाने सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध खंडणीचे तीन गुन्हे दोन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. एक महिना ते पोलीस कोठडीत होते. यादरम्यान तपासातून संघटित गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांच्याविरुद्ध मकोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली. त्यानुसार, बुधवारी चारही आरोपींना ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयासमोर हजर करण्यात आले.खंडणीविरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त एन.टी. कदम यांनी यावेळी पोलिसांची बाजू न्यायालयासमोर मांडली. इक्बाल कासकरच्या मोबाइल फोनचा तपशील खंडणीविरोधी पथकाने संबंधित कंपनीकडून मागवला होता. कासकर थेट दाऊद आणि शकीलच्या संपर्कात असल्याचे या तपशिलातून स्पष्ट झाले. दोन वर्षांमध्ये त्याने शंभरपेक्षा जास्त वेळा दाऊद आणि शकीलशी संपर्क साधला. याशिवाय, त्याने दुबईलाही मोठ्या प्रमाणात कॉल्स केले. यासाठी व्हीओआयपी कॉल्ससह स्काइप आणि इमोसारख्या अ‍ॅप्लिकेशन्सचाही वापर केल्याचा दावा पोलिसांनी या वेळी केला.आरोपींच्या सखोल चौकशीसाठी त्यांना कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली. पोलिसांच्या दाव्यांमध्ये नवे काहीच नसल्याचे सांगत कासकरचे वकील श्याम केसवानी यांनी कोठडीस विरोध दर्शवला. न्यायालयाने इक्बाल कासकरसह चौघांना ४ नोव्हेंबरपर्यंत मकोका कोठडी सुनावली.>दोन आरोपी फरारचआरोपी खंडणीसाठी बिहारच्या शूटर्सचा वापर करत होते. आरोपींच्या चौकशीतून शम्मी आणि गुड्डू नामक दोन शूटर्सचा तपशील पोलिसांना मिळाला आहे. हे दोन्ही आरोपी फरार आहेत. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आरोपींना कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर केली.

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकरDawood Ibrahimदाऊद इब्राहिम