डोंबिवली : एखादा पदाधिकारी बदलल्यास तत्परतेने त्यांच्या सूचनेनुसार लाखो रुपये खर्चून त्यांच्या दालनाला कार्पाेरेट लूक देणाऱ्या केडीएमसी प्रशासनाने आपल्या मालमत्तांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केला आहे. शहरातील क्रीडासंकुलातील सुरक्षा चौकीचा दरवाजा तुटला आहे. पाच ते सहा महिन्यांपासून ही अवस्था असून तो बदलायला प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. संकुलातील अन्य मालमत्तांच्या चाव्या याच चौकीत असल्याने दरवाजाअभावी त्यांचीही सुरक्षा धोक्यात आली आहे.
केडीएमसीचे हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष झाले आहे. पुरेशा सुरक्षा कर्मचाºयांअंभावी येथील सुरक्षा राखायची तरी कशी?, असा प्रश्न येथील कर्मचाºयांना पडला आहे. त्यातच काही महिन्यांपासून त्यांच्या चौकीचा दरवाजाच तुटल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. क्रीडासंकुलातील भांडारगृह आणि अन्य मालमत्तांच्या चाव्या या चौकीत ठेवल्या जातात, परंतु चौकीचा दरवाजाच मोडल्याने खबरदारी म्हणून चाव्या सुरक्षा कर्मचाºयाला सोबत घेऊनच फिरावे लागत आहे.केडीएमसीने सुरक्षा कर्मचाºयांची कमतरता असल्याने भांडुप येथील सुरक्षा बोर्डाचे ३४ कर्मचारी घेतले आहेत. त्यातील २० कर्मचारी डोंबिवली विभागासाठी दिले आहेत. क्रीडासंकुलात प्रत्येक शिफ्टसाठी तीन कर्मचारी तैनात केले जातात. दोन कर्मचारी तरणतलावाच्या सुरक्षेसाठी, तर क्रीडासंकुलाच्या सुरक्षेसाठी केवळ एक कर्मचारी आहे. ही सुरक्षा कमी असल्याने संकुलाच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक बंद केले आहे. सुरक्षा कर्मचाºयांसाठी असलेली चौकीही सुस्थितीत नाही. दरवाजा तुटल्याने पावसाच्या पाण्याची गळती होत आहे. नवीन दरवाजा बसविण्याबाबत मे महिन्यात सुरक्षा विभागाने बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती बिकट आहे.अश्लील चाळ्यांचे मैदानात खेळअपुºया संख्येमुळे क्रीडासंकुलाची सुरक्षा राखताना दमछाक होत आहेत. त्यातच महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा वाढलेला वावर त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. रात्री उशिरापर्यंत गांजा, चरसचे व्यसन करण्याबरोबरच दारूच्या पार्ट्याही बिनदिक्कतपणे येथे झोडल्या जात आहेत. त्यांना हटकल्यानंतर नशेबाज तरुण सुरक्षा कर्मचाºयांना धमकावतात. प्रसंगी मारहाण केल्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. अश्लील चाळेही येथे सर्रासपणे सुरू असून त्यांना विरोध केला असता संबंधित तरुण-तरुणींकडून उद्धट उत्तरे सुरक्षा कर्मचाºयांना ऐकविली जातात प्रसंगी मारहाणही केली जाते. सुरक्षेची जबाबदारी असलीतरी जीव मुठीत धरूनच सुरक्षेचे कर्तव्य पार पाडावे लागते, अशी खंत कर्मचाºयांकडून व्यक्त होत. संकुलातील ‘इ’ प्रभागाचे कार्यालय दावडीतील रिजन्सी संकुल येथे स्थलांतरित केल्यानंतर तेथील बंद असलेल्या कार्यालयाच्या जागेचा वापरही अश्लील चाळे आणि नशेसाठी केला जात आहे. या सगळ्या प्रकाराकडे मानपाडा पोलिसांचेही दुर्लक्ष झाले असून एखादी घटना घडल्यानंतरच पोलिसांना जाग येणार का?, असा सवाल एकंदरीत चित्र पाहता उपस्थित होत आहे.भांडारगृहाचीही दुरवस्था : क्रीडासंकुलात महापालिकेचे भांडारगृह असून त्याचीही दुरवस्था झाली आहे. त्यात कल्याण व डोंबिवली येथील महापालिका कार्यालयांमधील महत्त्वाची कागदपत्रे आणि कामगारांना दिल्या जाणाºया वस्तूंचा साठा करण्यात आला आहे. परंतु, येथील दरवाजे गंजलेले आहेत तर जागाही अपुरी पडत आहे. त्यात आजुबाजूला झाडेझुडपे वाढल्याने सापांचा वावर आहे. शौचालयांचीही पुरती दैना झाली आहे.