शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

केडीएमसीत सामान्य नागरिकांना दुपारी तीननंतरच मिळणार प्रवेश

By admin | Published: January 07, 2016 12:35 AM

नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आपल्याला भेटा, असा फतवा आयुक्त

कल्याण : नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आपल्याला भेटा, असा फतवा आयुक्त ई. रवींद्रन यांनी नुकताच जारी केला असताना आता यात आणखीन एका फतव्याची भर पडली आहे. यानुसार, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना भेटायचे असल्यास नागरिकांना दुपारी ३ नंतरच मुख्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. एकीकडे समस्यांचे निराकरण वेळेवर होत नसल्याची तक्रार असताना दुसरीकडे अशा प्रकारचे वेळेचे बंधन घातले गेल्याने नागरिकांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे.मुख्यालयात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत असल्याने बऱ्याचदा अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय येतो. त्यामुळे दैनंदिन कामकाज करण्यास त्यांना अडथळा निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालय इमारतीतील प्रवेशाचे ज्या प्रकारे नियमन केले आहे, त्या धर्तीवर केडीएमसी मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश देण्याबाबत नियमन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने वेळेचे हे नियमन केल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेच्या सेवेत असलेले अधिकारी आणि कर्मचारी, सर्व पदाधिकारी, महापालिका सदस्य तसेच अन्य लोकप्रतिनिधी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी येणारे शासकीय, अशासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांना महापालिकेत कधीही येण्याची मुभा असेल. परंतु, वैयक्तिक कामासाठी त्यांना सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना दुपारी ३ वाजल्यानंतरच भेटता येईल, असेही जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. हे आदेश १ जानेवारीपासून लागू केले असले तरी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने मात्र बुधवारी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. (प्रतिनिधी)