शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

पुनर्वसनामध्ये केडीएमसीकडून दुजाभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:38 AM

रस्ता रुंदीकरण असो अथवा अन्य प्रकल्पांत विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीकडून दिरंगाई होते.

कल्याण : रस्ता रुंदीकरण असो अथवा अन्य प्रकल्पांत विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीकडून दिरंगाई होते. मात्र, काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याचा आरोप होत आहे. शिवाजी चौक ते महंमदअली चौक मार्गावर रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या व्यापाºयांचे तत्काळ पुनर्वसन केल्याने जुन्या विस्थापितांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी एका बाधिताने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करत गाळेवाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.केडीएमसीने जानेवारी २०१६ मध्ये पश्चिमेतील शिवाजी चौक ते महंमद अली चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले होते. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील असलेल्या दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यात आला. त्यात काही इमारतीही बाधित झाल्या. या कारवाईअंतर्गत ३१२ जणांना नोटिसा बजावल्या होत्या, परंतु या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या काही व्यापाºयांनी सर्रासपणे दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकामे केली. काही बांधकामांचे इमले दोन ते तीन मजल्यांपर्यंत उभारले गेले. ज्यांच्या बांधकामांना स्थगिती आदेश आहेत, त्यांचेही या रस्ता रुंदीकरणात चांगलेच फावले. निवासी वापरासाठी असलेल्या इमारतींना रस्ता रुंदीकरणानंतर व्यवसायिक स्वरूप आले. एकंदरीतच हे चित्र पाहता, केडीएमसी प्रशासनाची डोळेझाक भूमिका त्या वेळी संशयास्पद अशी ठरली होती. संबंधित अधिकाºयांवर कारवाई करा, असे ठरावही त्या वेळी एकमताने स्थायी आणि महासभेत मंजूर करण्यात आले होते, परंतु कालांतराने मात्र सर्वांनीच मौन पाळल्याने वाढीव बांधकामे जैसे थे राहिली. दरम्यान, या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांना डोंबिवलीतील पी.पी. चेंबर्स येथे तयार गाळे देऊन त्यांचे तत्काळ पुनर्वसन केल्याकडे तक्रारदार राम बनसोडे यांनी लक्ष वेधले आहे.बनसोडे यांचा राम फुटवेअर गाळा दक्षता पोलीस चौकी ते वनश्री सृष्टी या रस्ता रुंदीकरणात तोडला. परंतु झोजवाला शॉपिंग सेंटर, सॅटीस प्रकल्प आणि बीएसयूपी योजनेमध्ये गाळा देण्याच्या आश्वासनाव्यतिरिक्त काहीही मिळालेले नाही. २००६ मध्ये गटई स्टॉलचे लायसन्स दिले होते. परंतु, पुनर्वसन समितीने गाळा देण्याऐवजी गटई स्टॉल दिला, असा चुकीचा निष्कर्ष ठेवून आम्हाला लाभापासून वंचित ठेवल्याचे बनसोडे यांचे म्हणणे आहे.>२००३ पासून गाळ्यापासून वंचित२००३ पासून पाठपुरावा सुरू असताना आम्ही अद्याप वंचित आहोत, परंतु २०१६ मधील बाधितांचे तत्काळ पुनर्वसन केले आहे. केडीएमसीचा हा दुजाभाव असून, संबंधितांकडून पैसे घेऊन त्यांना गाळ्यांचे वाटप केल्याचा बनसोडे यांचा आरोप आहे. या संदर्भात मालमत्ता विभाग व्यवस्थापक अमित पंडित यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका