शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

केडीएमसीची निवडणूक लांबणीवर?, २७ गावांचे भवितव्य अधांतरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:00 AM

केडीएमसीतून गावे वगळण्याची मागणी पाच वर्षांनंतर मंजूर झाली. महाविकासआघाडी सरकारने २७ मधील १८ गावे वगळली आणि नऊ गावे महापालिकेत शहरीकरण झाल्याच्या मुद्यावर कायम ठेवली आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी नऊ गावे महापालिकेत कायम ठेवून उर्वरित १८ गावे वगळण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ मार्चला विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. परंतु, याबाबतची अधिसूचना काढण्यात आलेली नाही. कोरोनाचा फटका या प्रक्रियेलाही बसला असून, ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या केडीएमसीची निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. मात्र, केडीएमसी प्रशासनाने सध्यातरी यावर चुप्पी साधली आहे.केडीएमसीतून गावे वगळण्याची मागणी पाच वर्षांनंतर मंजूर झाली. महाविकासआघाडी सरकारने २७ मधील १८ गावे वगळली आणि नऊ गावे महापालिकेत शहरीकरण झाल्याच्या मुद्यावर कायम ठेवली आहेत.गावांसाठी लढणाºया २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने चुकीचा निर्णय लादला असून, पूर्णपणे २७ गावे न वगळता त्यातील नऊ गावे महापालिकेतच ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा एकप्रकारे ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अवलंबिलेल्या नितीसारखा आहे, असे म्हटले आहे.नगरपरिषदेची मागणी आमची नव्हती तर नगरपालिकेची मागणी होती. परंतु, १८ गावांची नव्हे तर पूर्णपणे २७ गावांची नगरपालिका हवी, त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही समितीने दिला आहे. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा लढा पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने केला आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या निर्णयाच्या अधिसूचनेनंतरच पुढील कार्यवाही होईल, असे स्पष्ट करत सरकारच्या निर्णयावर भाष्य करण्यास प्रशासनाने सध्या तरी नकार दिला आहे.कोणतीच प्रक्रिया नाही : केडीएमसीची निवडणूक आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तत्पूर्वी जूनमध्ये आरक्षण सोडत पार पडणे आवश्यक आहे. त्यात गावे वगळण्याचा निर्णय झाल्याने त्याची अधिसूचना जारी झाल्यावर नव्याने प्रभागरचना होईल. परंतु, अद्याप अधिसूचनाच जारी न झाल्याने महापालिका निवडणुकीसंदर्भातील कोणतीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केडीएमसीची निवडणूकही इतर महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांप्रमाणे पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका