शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

केडीएमसीकडे पाणीपुरवठ्याचे ३०७ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:49 PM

२७ गावांचाही समावेश : कारखान्यांसह सरकारी कार्यालयांवरही मोठ्या प्रमाणात थकबाकी

कल्याण : पाणीपुरवठ्याच्या बिलापोटी केडीएमसी आणि २७ गावांकडे एमआयडीसीची तब्बल ३०७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी मागील अनेक वर्षांपासून ही थकबाकी असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. केडीएमसी आणि २७ गावांसह कारखाने आणि अन्य सरकारी कार्यालयांचीही थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. एमआयडीसी परिक्षेत्रात पाणीगळतीचे प्रमाण १७.२२ टक्के असून ही गळती आणि पाणीचोरीला आळा घातल्यास पाणीकपात करण्याची गरजच भासणार नाही, याकडे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.

नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून पाणीबिलाची बिले डोळे विस्फारणारी समोर आली आहे. या माहितीनुसार, केडीएमसीकडून एमआयडीसीला देय असलेली पाणीबिलाची रककम १५५ कोटी ७२ लाख असून २७ गावांची थकबाकी १५२ कोटी सहा लाख इतकी आहे. पूर्वीची थकबाकी, त्यात परिक्षेत्रातील काही गावठाणांना होणाऱ्या पाच एमएलडी पाणीपुरवठ्याची थकीत रक्कम आणि महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांची थकबाकी अशी एकूण ३०७ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी केडीएमसीकडून एमआयडीसीला येणे आहे. महत्त्वाचे म्हणजे, एमआयडीसी परिक्षेत्रातील सुमारे १०० कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात पाणीबिल थकवले असून ती थकबाकीही कोट्यवधींच्या घरात आहे. प्रदूषणामुळे काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. त्याला कारणीभूत ठरलेल्या ओमकार इंजिनीअर्स कंपनीचाही या थकबाकीदारांमध्ये समावेश आहे.

२१ जानेवारी २०१४ रोजी एमआयडीसी परिक्षेत्रात हिरवा पाऊस पडला होता. यात बेकायदेशीरपणे रंग बनवणाºया ओमकार इंजिनीअर्स या कंपनीला जबाबदार धरण्यात आले होते. या कंपनीला नोटीस बजावून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईदेखील केली होती. यावर्षी या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या कंपनीकडे एक लाख १३ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर अन्य सरकारी कार्यालयांकडूनही लाखोंची रक्कम एमआयडीसीला येणे बाकी आहे. दरम्यान, केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थकीत रकमेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर याबाबत बोलणे शक्य होईल, असे सांगितले. परंतु, २७ गावांची थकबाकी ती महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वीची असेल. ही थकबाकी कदाचित एमआयडीसीवर लादली गेली असावी, असेही त्यांनी सांगितले.नवीन जलवाहिन्यांचे काम सुरू : डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम १९ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कल्याण रोड व खंबाळपाडा रोडच्या बाजूने जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्याची मुदत जुलै २०२० पर्यंत आहे. फेज-१ मधील कामाची निविदा मंजुरीसाठी सादर करण्यात आली असून हे काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.गळती नसल्याचा दावासद्य:स्थितीत एमआयडीसी परिक्षेत्रात सलग ३० तासांची पाणीकपात लागू आहे. त्यामुळे गुरुवार सायंकाळपासून ते शुक्रवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद असतो. दरम्यान, माहितीच्या अधिकारात एमआयडीसी परिक्षेत्रात पाणीगळतीचे प्रमाण १७.२२ टक्केअसल्याचे समोर आले आहे. कमीजास्त होणारा पाण्याचा दाब, यात जलवाहिनीवरील एअरव्हॉल्व्ह तसेच जोडणी नादुरुस्त होऊन गळती होत असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. गळती होणाºया जलवाहिन्या तत्काळ दुरुस्त केल्या जात असून सद्य:स्थितीत कोणतीही गळती होत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका