अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीकरांची आयएएस अधिकाऱ्याची प्रतीक्षा संपली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बुधवारी केडीएमसीला रवींद्रन यांच्या रूपाने सनदी अधिकारी दिला. गुरुवारी सकाळी ११.३० वा. ते महापालिकेचा चार्ज घेणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. या ठिकाणी आल्यानंतर ते तातडीने २७ गावांच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावणार आहेत. यासह अन्य पाच कामांना प्राधान्य देणार असल्याचेही ते म्हणाले. सिंधुदुर्गहून त्यांनी लोकमतशी संवाद साधत ही माहिती दिली. नव्याने आलेल्या २७ गावांना तातडीने सर्व सुविधा देण्यासह तेथील विकासासाठी विशेष निधी-महसूल कसा मिळवता येईल, या दृष्टीनेही पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. या महापालिकेतील कचऱ्याचा प्रश्नही गंभीर असून तो मार्गी लावणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी कोणकोणत्या योजना करता येतील, यादृष्टीने तातडीने पावले उचलणार असल्याचे ते म्हणाले. तसेच येथील बीएसयूपीसह जेएनएनयूआरएमचे जे प्रकल्प रेंगाळलेले आहेत, त्यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
केडीएमसीला आयएएस आयुक्त
By admin | Published: July 23, 2015 3:56 AM