शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

केडीएमसी-एमएमआरडीएची टोलवाटोलवी

By admin | Published: March 02, 2016 1:45 AM

मानपाडा रोडवरील भोपरनजीक प्रायमाटेक्स या बंद कंपनीच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या डी-मार्ट मॉलचे बांधकाम रोखण्याची जबाबदारी आमची नसून नियोजन प्राधिकरण

डोंबिवली: मानपाडा रोडवरील भोपरनजीक प्रायमाटेक्स या बंद कंपनीच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या डी-मार्ट मॉलचे बांधकाम रोखण्याची जबाबदारी आमची नसून नियोजन प्राधिकरण या नात्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ची आहे, अशी अजब भूमिका कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने घेतली आहे. कामगारांची देणे न देता जमिनीवर मॉल उभारण्याच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी आगरी युथ फोरमने केली होती.प्रायामटेक्स कंपनी बंद पडली तेव्हा पाच हजार कामगार कामावर होते. डी-मार्ट मॉल बांधणाऱ्या कंपनी मालकाने कंपनीची जागा लिलावात ४ कोटी ७१ लाख रुपयांना खरेदी केली. जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीने १७१कामगारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रत्येकी ३० हजार रुपयांचे धनादेश दिले. उच्च न्यायालयाने सर्व कामगारांची देणी देण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त प्र. ना. पवार यांच्या निदर्शनास आणले. मॉलचे बांधकाम स्थगित करण्याचा आदेश देण्याचे अधिकार सहाय्यक कामगार आयुक्तांना नसून कामगार आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी तो प्रस्ताव कामगार आयुक्तांकडे पाठविला नसल्याची माहिती वझे यांनी दिली आहे. मात्र पवार यांनी महापालिकेस एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्याचे स्पष्ट केले होेते. बांधकामाला दिलेली परवानगी रद्द करण्याचा मुद्दा शासकीय मिटींगमध्ये तत्कालीन कामगार मंत्र्यांनी नमूद केला होता. त्याआधारेच कल्याण-डोंबिवली महापालिकेने डी- मार्टला नोटीस काढली. त्यांनी कशाच्या आधारे बांधकाम सुरु केले आहे. त्याचे कागदपत्रे सादर करा. अन्यथा सदर बांधकाम बेकायदा असल्याचे ग्राह्य धरले जाईल. महापालिकेने नोटीस काढून त्याची प्रत कल्याण टिळकचौकातील एमएमआरडीएच्या कार्यालयास पाठविल्याचे म्हटले आहे. दरम्यान डी-मार्टचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या मते त्यांच्याकडे कायदेशीर परवानगी आहे. कामगार आयुक्तच काय कोणीही कोणतीही कारवाई करण्याची नोटीस काढण्यापूर्वी आम्हाला त्याची पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. कंपनीची देणी देण्याचा जो काही वाद होता. त्याच्याशी डी मार्टच्या बांधकाम करणाऱ्यांचा काही संबंध नाही.