कल्याण : केडीएमसीतील ६९ जणांना शुक्रवारी पदोन्नती देण्यात आली. यात ६५ सफाई कामगार मुकादम झाले असून नंदकुमार पाथरे आणि अनिरुद्ध सराफ या दोन कनिष्ठ अभियंत्यांना सहायक नगररचनाकार, तर लघुलेखक असलेल्या मेरी सॅबेस्टीन यांना वरिष्ठ लघुलेखक आणि सुरक्षा अधिकारी असलेले सुहास खेर यांना सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी या पदावर बढती देण्यात आली आहे. डिसेंबर १९९९ पासून ही पदे रिक्त होती. महापौर दालनात झालेल्या कार्यक्रमात संबंधितांना पत्रे देण्यात आली. महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार श्रीकांत शिंदे, सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
केडीएमसीत ६९ जणांना बढती
By admin | Published: October 29, 2016 4:04 AM