शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

२७ गावांतील मुलांचा ‘फुटबॉल’ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:27 AM

केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील आठ शाळांच्या संघांना गुरुवारपासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला होता. ही बाब भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना समजताच त्यांनी बिर्ला महाविद्यालय गाठून

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील आठ शाळांच्या संघांना गुरुवारपासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला होता. ही बाब भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना समजताच त्यांनी बिर्ला महाविद्यालय गाठून आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रशासनाने नमते घेत या संघांना प्रवेश देणार असल्याचे स्पष्ट केले.जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व केडीएमसी यांनी बिर्ला कॉलेजच्या मैदानात जिल्हास्तरीय ५८ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा भरवली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी १७ व १४ वर्षे वयोगटांखालील ही स्पर्धा होत आहे. त्यात पालिका हद्दीतील २५ पेक्षा जास्त शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. मात्र, २७ गावे ग्रामीण भागात येत असल्याचे कारण पुढे करत तेथील आठ शाळांच्या संघांना स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला. पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी स्पर्धेचे ठिकाण गाठले. जोपर्यंत प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मैदानातच आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे आयोजकांनी नमते घेतले. ग्रामीणमधील आठ शाळांचे सामने शुक्रवारी होणार आहेत.पालिका विभागातील खेळाडूंना जिल्हापातळीवर खेळता यावे, यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सरकारदरबारी पाठपुरावा केला होता. २७ गावांमधील शाळा आजपर्यंत पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. त्यामुळे तेथील खेळाडूंना स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला. या शाळा तातडीने जिल्हा परिषदेने पालिकेस हस्तांतरित कराव्यात, असे आदेश १५ जूनला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने त्याचा फटका जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाºया शाळांना बसला.कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे म्हणाले, केडीएमसीचे प्रभारी क्रीडा अधिकारी राजेंद्र मुकणे यांनी २७ गावांतील शाळा केडीएमसीकडे हस्तांतरित न केल्याने स्पर्धेत खेळाडू्ंना प्रवेश नाकारला होता. ग्रामीण भागातील शाळाही केडीएमसीकडे कर भरतात. मग, तेथील खेळाडूवर अन्याय का? तसेच ग्रामीण भागातून स्पर्धेत उतरल्यास विद्यार्थ्याला प्रथम तालुका, जिल्हा आणि विभाग या पातळीवरून जावे लागते. २७ गावांतील शाळा केडीएमसीत आल्याने विद्यार्थी आता जिल्हा पातळीवर खेळू शकतो. मग, तालुका पातळीवर खेळून खेळाडूंचे नुकसान का करायचे? डिसेंबरपर्यंत अशा ४० प्रकारच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.