डोंबिवली- सूतिकागृहामध्ये ‘मदर अॅण्ड चाईल्ड सेंटर’ उभे करण्यासाठी रोटरी क्लबने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे प्रस्ताव मांडला आहे. त्यासाठी एकूण 25 कोटीची तरतूद रोटरी क्लबने केली आहे. मात्र महापालिका त्याकडे डुकुनही पाहत नाही, अशी खंत बालरोगतज्ञ आणि रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रीक्ट गव्र्हनर डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट आयोजित कै. परशुराम महाजन धनी माधवाश्रम व कै. प्रमोदिनी गजानन निमकर स्मृती आरोग्य सेवाव्रती पुरस्काराचे वितरण शुभमंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. कोल्हटकर बोलत होते. हा पुरस्कार डॉ. विजय नेगलूर व डॉ. उल्हास कोल्हटकर यांना प्रदान करण्यात आला. मुंबई महानगरपालिका आरोग्यसेवा माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. निशिकांत पतंगे, डॉ. सुनील गडकरी, डॉ. यशवंत घोटीकर ,डॉ. विश्वास पुराणिक, डॉ. इंद्रनील भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कोल्हटकर म्हणाले, आम्हाला पक्षीय राजकारणांशी काय घेणोदेणो नाही. अजून ही केडीएमसीने या प्रकल्पाला परवानगी दिल्यास आम्ही त्यांची अंमलबजावणी करू. डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी आहे मात्र याठिकाणी अद्याप मेडीकल कॉलेज नाही. भारतात आरोग्याची परिस्थिती गंभीर आहे. अमेरिकेत 2क् हजार रूपये प्रतिमाणूस आरोग्यावर खर्च केला जातो तर भारतात हाच दर 9क्क् रूपये प्रतिमाणूस आहे. त्यामुळेच आपल्याला आरोग्यनिधी उभारवा लागतो. त्याची कारणो काहीही असली तरी सरकार हे करीत नाही. संस्थांना त्यासाठी पुढे यावे लागते. 1992 मध्ये डोंबिवलीतील सर्व डॉकटरांनी एकत्र येऊन डोंबिवली फिव्हरचा नायनाट केला. डॉक्टरांनी नकारत्मक गोष्टी न ऐकू नये असे ही त्यांनी सांगितले.
अविनाश सुपे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रत तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली असली तरी सेवाधर्म विसरू नका. सेवाधर्म रूग्णसेवेचा कणा आहे. आपल्याकडील अर्थसंकल्प मोठे असतात. पण त्यातील किती रक्कम प्रत्यक्ष आरोग्य सेवेवर खर्च होते हा प्रश्न आहे. यामधून गरीब रूग्णाची सर्वाधिक परवड होते अशा वेळी वैद्यकीय मदत निधीसारख्या संस्था खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईतील रूग्णालयात काम करताना आम्ही सामाजिक दायीत्वाच्या नात्याने 5क् ते 1क्क् कोटीचा निधी उभा केला आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्रामीण भागातील मुलगी उपचारासाठी मुंबईत आली होती. तिच्या आईवडीलांकडील उपचारांसाठीच पैसे संपले त्यावेळी त्यांनी व्हेटीलेटर काढून टाकण्यास सांगितले आणि निघून गेले. पण एका डॉक्टरला रूग्णाचे प्राण वाचविणो हेच प्रथम कर्तव्य आहे. प्रत्येक डॉक्टरनी वैद्यकीय सेवा धर्म पाळला पाहिजे, असा सल्ला ही त्यांनी दिला.
डॉ. नेगूलर म्हणाले, सध्या तरूण पिढी भरकटलेली दिसून येत आहे. दिवसभर फक्त खात सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मधुमेह, रक्तदाब अश्या विविध समस्या दिसून येत आहेत. आईवडिलांची सेवा करायच्या वयात त्यांचीच आईवडील सेवा करीत आहेत. योग्य व्यायाम आणि आहार ठेवल्यास मधुमेह नियंत्रित होऊ शकतो, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विश्वास पुराणिक यांनी केले. डॉ. सुनील गडकरी, डॉ. पिपुंटकर आणि डॉ.निशिकांत पतंगे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय भोळे यांनी केले.