शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

'केडीएमसीतील टीडीआर घोटाळा ५० कोटींचा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:45 PM

मनसे गटनेने प्रकाश भोईर यांचा आरोप; कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

कल्याण : महसूल विभागातील सातबाऱ्यावर खाडाखोड करून कागदपत्रे कल्याण-डोंबिवली महापालिकेस सादर केली गेली. महापालिकेने त्या जागेचा टीडीआर दिला. ही सरकारची फसवणूक आहे. हा ५० कोटींचा टीडीआर घोटाळा असल्याचा आरोप मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी केली आहे. हा टीडीआर रद्द करून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.यासंदर्भात माहिती देण्यासाठी गटनेते भोईर यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत उपस्थित होते. याविषयी भोईर म्हणाले की, १८ हजार ५२५ मीटर जागेचा हा घोटाळा आहे. जवळपास २२ एकर जागेचा टीडीआर घेण्यात आला असून ही जागा सरकारी म्हणून घोषित झालेली आहे. टीडीआर घेण्यासाठी महसूल खात्यातून जागेच्या सातबारासंदर्भात खोडखाड केली आहे. सर्व्हे नंबर ३१ ची जागा खाजगी आहे. सर्व्हे नंबर ३२ ची जागा गुरचरण आहे. टीडीआर घेणाºयाने ३१ ला ३२, तर ३२ ला ३१ दाखविले आहे, असा उलटफेर केला आहे. या फेरफारामध्ये तीन एकर जागा सरकारी दाखवली आहे आणि जवळपास २२ एकर जागेचा टीडीआर घेतला आहे. महापालिकेस सादर करण्यात आलेल्या सातबाºयावरही हाताने खाडाखोड केली आहे. टीएलआर न करताच सातबारा सादर केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली असून या प्रकरणाची चौकशी सुरूआहे. तहसीलदार व भूमिअभिलेख अधिकाºयांनी याप्रकरणी अहवाल सादर केला आहे. यासंदर्भातीलर् कागदपत्रेही भोईर यांनी यावेळी सादर केली. महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची नोटिस न देता परस्पर टीडीआर बहाल केला आहे. या प्रकरणातील अधिकारी व माहिती सादर करणारे व खाडाखोड करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हा टीडीआर तातडीने रद्द करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे.‘...तर न्यायालयात जाणार’टीडीआर लाटणाºयांनी हा टीडीआर कोणत्या बिल्डरला विकला. त्याचे पैसे कोणत्या खात्यात जमा झाले. याचा शोध घेतला गेल्यास त्यातून सरकारच्या फसवणुकीचा उलगडा होईल.संबंधितांची चौकशी करून त्यांच्याविरोधात तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात प्रथम सरकारी यंत्रणांकडे दाद मागितली आहे.त्याचा पाठपुरावा मनसेच्या वतीने सुरू आहे. सरकारी यंत्रणांनी दाद दिली नाही तर न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा भोईर यांनी दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे