कल्याण : केडीएमसीतील अधिकारी मानसिक त्रास देत आहेत. महापालिका प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे. तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिकाºयांनी माझ्यावर हल्ला केला होता, असा आरोप करत महापालिकेतील कर्मचारी रमेश पौळकर यांनी शुक्रवारी मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, त्रास देणाºया अधिकाºयांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांनी पौळकर यांना दिले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी आंदोलन मागे घेतले.महापालिका मुख्यालयात पौळकर यांनी ठिय्या धरताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत अधिकारी व्यस्त असल्याने प्रशासनाकडून कोणीही आपली भेट घेतली नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पौळकर यांना पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला.पौळकर यांचा आरोप आहे की, सुरक्षा अधिकारी सुहास खेर व अन्य सहकाºयांनी मला मानसिक त्रास दिला आहे. प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहेत. राज्यमंत्री चव्हाण यांनी सावरकर उद्यानात थाटलेले ‘जाणता राजा’ हे कार्यालय बेकायदा असल्याची तक्रार मी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. यासंदर्भात उपायुक्त सु. रा. पवार यांच्याकडे मी विचारणा करताच त्यांनी माझ्यावर पेपरवेट फेकून मारले. त्यामुळे माझा दात पडला. दरम्यानच्या काळात माझ्यावर राज्यमंत्री चव्हाण व त्यांच्या पदाधिकाºयांनी हल्ला केला.
केडीएमसीत कर्मचाºयाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:25 AM