कल्याण : सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्या आपापसांतील लाथाळ्या व श्रेयवादासाठी चाललेली कुरघोडी याला फारसे महत्त्व न देता नागरिकांच्या हिताची जबाबदारी आपली असल्याचे भान ठेवत आमचा पक्ष काम करत आहे. निष्क्रियतेमुळे सत्ताधारी शिवसेनेवर विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची नामुश्की ओढवली आहे. परंतु, नागरिकांच्या हितासाठी आम्ही इथे सत्ताधाºयांच्या भूमिकेत आहोत. मनसेशिवाय महापालिकेला कोणीही वाली राहिलेला नाही. आमच्यावरच केडीएमसीची भिस्त आहे, असा दावा विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.शिवसेनेचे मंगळवारचे आंदोलन पाहता सत्ताधाºयांच्या प्रशासनावर कोणताही वचक नसल्याचे दिसले. सत्तेतही विरोधाची भूमिका, या दुटप्पी शिवसेनेच्या धोरणावर सर्वत्र टीका होत असताना विरोधी पक्ष असलेल्या मनसेनेही आतापर्यंत शिवसेनेने महापालिकेसाठी काय केले, असा सवाल केला आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी जी कृती सत्ताधाºयांकडून अपेक्षित होती, ती आमच्याकडून होत असल्याचे हळबे यांचे म्हणणे आहे.मुख्यंमत्र्यांकडे केलेला पत्रव्यवहार आणि त्यासंदर्भातील पाठपुरावा पाहता ‘एलबीटी’च्या बदल्यात ‘जीएसटी’चे १९ कोटी ८२ लाखांचे अनुदान महापालिकेला मिळवून देण्यात मनसेला यश आले. केडीएमसीचे नाव उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारितील सीए इन्स्टिट्यूट चालू करण्यासंदर्भात पाठपुरावा करून महासभेत ठराव मंजूर करून घेतला. शहरातील वाहतूकव्यवस्था, रिक्षा स्टॅण्डचे नियोजन, परिवहन सेवेत सुधारणा होण्याच्या दृष्टीने वाहतूक शाखा, आरटीओ आणि केडीएमसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यासाठी पार्किंग आणि हॉकर्स पॉलिसी ठरवण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला. त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासन आणि सत्ताधाºयांकडे पाठपुरावाही सुरू आहे. परंतु, त्यांचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे हळबे म्हणाले.स्मार्ट सिटीत सर्व स्थानकांचा होणार विकासस्मार्ट सिटीमध्ये केवळ कल्याणच्याच प्रकल्पांचा समावेश होता. परंतु, विशेष बहुउद्देशीय वहन समितीकडे केलेल्या प्रयत्नांमुळे महापालिका हद्दीतील सर्वच रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला. द्विपद्धतीय लेखानोंद राबवत असताना प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांचा ताळेबंद सादर केलेला नव्हता. ताळेबंदविना अंदाजपत्रक सादर केले जात होते, याला मनसेने हरकत घेतली असता अंदाजपत्रक सादर करताना ताळेबंद देण्यास प्रशासनाला भाग पाडले. घनकचºयाचा मुद्दा सध्या चांगलाच गंभीर बनला आहे. परंतु, आम्ही आमच्या निधीतून वाहनखरेदी करून संबंधित विभागाला साहाय्य करत आहोत, याकडेही हळबे यांनी लक्ष वेधले.२०१४ मध्ये शहर विकास आराखडामहापालिका हद्दीचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्हीच २०१४ मध्ये शहरांचा विकास आराखडा सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाला सादर केला आहे. परंतु, सत्ताधाºयांना शहर विकासाच्या बाबतीत कोणतेही गांभीर्य नसल्याने आजतागायत तो आराखडा कृतीविना कागदावरच राहिला आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहता सध्या आमच्याच भरवशावरच केडीएमसीचा कारभार चालला आहे, असा दावा हळबे यांनी केला आहे.
केडीएमसीत विरोधकच खरे सत्ताधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:23 AM