शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती

By admin | Published: February 08, 2016 2:30 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जेमतेम दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त ९० पदे भरण्याकरिता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यास तब्बल नऊ वर्षे लागली आहेत.

मुरलीधर भवार,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जेमतेम दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त ९० पदे भरण्याकरिता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यास तब्बल नऊ वर्षे लागली आहेत. डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ अशी तब्बल ४०० पदांची भरती झाली तरच या रुग्णालयांतील आरोग्य सेवेत श्रेणीवाढ होईल. अन्यथा, या महापालिका क्षेत्रातील नागरिकांना निवासी इमारतीमधील नर्सिंग होम अथवा महागडी इस्पितळे यामध्येच उपचार घ्यावे लागतील, अशी गंभीर परिस्थिती आहे.केवळ, डॉक्टरांची पदे भरून चालणार नाही. त्यांना हवा असलेला ५० जणांचा पॅरामेडिकल स्टाफ भरणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार केला आहे. त्याला प्रशासनाकडून मान्यता मिळाली तरच डॉक्टरांच्या भरतीला पूरक अशी व्यवस्था उभी राहून आरोग्य सेवेला लाभ होईल. महापालिकेची १३ नागरी आरोग्य केंद्रे असून प्रत्येकी १२० खाटांची क्षमता असलेली डोंबिवलीत शास्त्रीनगर व कल्याणमध्ये रुक्मिणीबाई ही रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी संख्येबरोबरच खाटांची संख्या वाढवून प्रत्येकी २०० करण्याचे प्रस्तावित आहे. ही रुग्णालये सुयोग्य आरोग्य सेवा देण्यात कमी पडतात, अशी ओरड वारंवार केली जाते. या रुग्णालयांत विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. प्रसंगी रुग्णांना कळवा येथील शिवाजी सरकारी रुग्णालय, मुंबईतील केईएम, शीव रुग्णालयात पाठविले जाते. उल्हासनगरातील मध्यवर्ती सरकारी रुग्णालयातही धाडले जाते. महापालिकेने २००७ साली रुग्णालयांसाठी आवश्यक असलेल्या ९० डॉक्टरांच्या भरतीचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास जून २०१५ उजाडले. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, या अटीचा भंग होत असल्यास पदास मंजुरी दिली जात नाही. महापालिकेस चार फिजिशियनची गरज असताना प्राप्त अर्जांमध्ये फिजिशियनसाठी एकच अर्ज आला आहे. रेडिओलॉजिस्टसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या पदांचे काय करायचे, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. डॉक्टरांच्या नव्या भरतीमुळे पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त ३८ लाख रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.