ठाणे : वागळे इस्टेट येथील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप करून त्यांना पाठबळ देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून अनधिकृत गुटखा विक्र ीस आळा घालावा, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.ठाण्यातील महागिरी, मुंब्रा, भिवंडी व इतर काही भागात गुटख्याची विक्र ी सर्रास होत असून काही अधिकाºयांच्या वरदहस्तामुळेच हा धंदा फोफावला आहे. यापूर्वी त्याबद्दलची सविस्तर माहिती संबंधित सहआयुक्त शिवाजी देसाई यांना देऊनही त्याबद्दल उपाययोजनेबाबत काहीही न कळवणे ही बाब अत्यंत गंभीर व खेदजनक असल्याचे आमदार त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.जप्त केलेला गुटखा विक्रीसाठी बाजारातपोलिसांनी जप्त केलेला गुटखा ज्या गोदामात ठेवला जातो, त्या गुटख्याला मध्यरात्री काळोखात पाय फुटून तो बाजारात विक्र ीसाठी कसा जातो, असा सवाल करून त्या लबाडीची चौकशी करावी. तसेच गुटख्याची विक्र ी करणाºया आरोपीस पकडले तर त्यांना सोडवण्यासाठी कोण दलाल मध्यस्थी करतात यावर नजर ठेवावी. म्हणजे कुंपणच शेत खात असल्याचा अनुभव येईल, असे आमदार केळकर यांनी मंत्र्यांंची भेट घेऊन सांगितले. अन्न व औषध प्रशासन अधिकाºयांचे या प्रकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळेच दलालांचे फावल्याचा आरोप करून त्या अधिकाºयांवर कडक करवाई करून दलालांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी मंत्री रावळ यांच्याकडे क रताना स्वत: या प्रकरणात लक्ष घातले तर कारवाया बंद होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. रावळ हे या मागणीबाबत सकारात्मक आहेत, असे केळकर म्हणाले.
ठाणे एफडीएमध्ये दलालांचा सुळसुळाट, केळकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 1:46 AM