कल्याण : आंबिवली परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या मयूर एकनाथ डोळसे या तरुणाची हत्या गावाकडील ओळखीच्या गोकुळ रतन परदेशी याने केली असून त्याने मयूरला गुंगीचे औषध पाजून, गळा आवळून मारल्याचे उघड झाले. या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग असून परदेशीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.मयूर हा लोअर परळ येथे रेल्वेत प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला होता. कोळसेवाडीत तो सहकाºयांसोबत राहायचा. ओळखीचा असलेला गोकुळ परदेशी याने मयूरला ८ नोव्हेंबरला भेटायला बोलावले होते. परदेशी मुंबईतील एअरपोर्टमध्ये हमालीचे काम करतो. त्याला भेटायला गेलेला मयूर बेपत्ता झाला. त्याची माहिती मयूरच्या सहकाºयाने पोलिसांना दिली. परदेशीकडे चौकशी करूनही मयूरचा थांग लागला नाही. पण आंबिवली परिसरात १० नोव्हेंबरला मयूरचा मृतदेह आढळल्याने पोलिसी खाक्या दाखवताच परदेशीने ५० लाखांच्या खंडणीसाठी हत्या केल्याची कबुली दिली. मयूरच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने खंडणीसाठी त्याची हत्या होणे, पटण्यासारखे नसल्याचे त्याचे काका शिवाजी डोळसे यांचे म्हणणे आहे. कोळसेवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता मयूरची हत्येचे कारण परदेशीकडून शोधले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गुंगीचे औषध देऊन केली मयूरची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:50 AM