पालघर दि.10 जानेवारी:-केळवे रोड येथील झांजरोली लघुपाट बंधाऱ्याची गळती थांबविण्यात पाटबंधारे विभागाला यश आल्याने धरणाला असलेला धोका तूर्तास टळला आहे. गळतीची समस्या कायमस्वरूपी मिटविण्यासाठी 17 गावासाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था झाल्यास तात्काळ काम हाती घेतले जाईल अन्यथा 1 एप्रिल ते 31 मे ह्या दोन महिन्यांत काम पूर्ण करू असे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंते विजय घोगरे ह्यांनी लोकमत ला सांगितले.
केळवे येथील झांजरोली हे सुमारे 70 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेले आणि 2.600 दलघमी पाणी क्षमता असलेल्या धरणाची निर्मिती 40 वर्षांपूर्वी 1981 साली करण्यात आली होती.