शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

‘केशवसीता’ करणार प्लास्टिकमुक्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:49 AM

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गोळा होणाºया प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील केशवसीता ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने महापालिकेकडे प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

- मुरलीधर भवारकल्याण -  कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गोळा होणाºया प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील केशवसीता ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने महापालिकेकडे प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.पालिका हद्दीतून ६५० मेट्रीक टन घनकचरा दररोज गोळा केला जातो. त्याचे वर्गीकरण करून प्रक्रिया करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. जैव कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस तयार करण्यासाठी १३ ठिकाणी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी आयरे गाव व उंबर्डे येथे १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प केला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्याठिकाणी प्रत्येकी १० टन याप्रमाणे २० टन जैविक कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. महापालिका हद्दीतून जमा होणाºया एकूण घनकचºयापैकी ४९ टक्के कचरा हा सुका कचरा आहे. त्यापैकी ४५ टक्के म्हणजे ३०० मे.ट. कचरा हा प्लास्टिकचा आहे. त्यात प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे रॅपर, प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू यांचा समावेश आहे. सध्या महापालिका हद्दीत डोंबिवलीतील ऊर्जा फाउंडेशन प्लास्टिक कचरा गोळा करते. महिनाभरात गोळा केलेला प्लास्टिक कचरा हा प्रक्रियेसाठी जेजुरी येथील रुद्र फाउंडेशनकडे पाठवला जातो. त्याच्या वाहतुकीवर जास्त खर्च होतो. ऊर्जा फाउंडेशन ठाणे व डोंबिवलीतून जवळपास २२ टन प्लास्टिक कचरा गोळा करते. पुण्याच्या केशवसीतातर्फे सिंहगड, रायगड, बाणेश्वर, बारामती, भीमाशंकर याठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करून तो कचरा रुद्र फाउंडेशनकडे प्रक्रियेसाठी पाठवला जातो. प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून जे इंधन तयार होते, ते स्टोव्ह, बॉयलर्स, शेतीपंप, फर्नेस इत्यादीसाठी उपयुक्त आहे. केशवसीता ट्रस्टला काही अटीशर्तीवर प्रकल्प सुरू करण्यास दिला जाऊ शकतो. प्रकल्प उभारण्यासाठी केशवसीताला ४०० चौरस मीटर इतकी मोकळी जागा हवी आहे. तसेच विजेचा पुरवठा आवश्यक आहे. हा प्रकल्प संस्थेला १० वर्षे नाममात्र भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला जाईल. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संस्थेची असेल. तसेच पर्यावरण खात्याकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्याची जबाबदारी संस्थेचीच राहील. प्रकल्प एक महिन्यापेक्षा जास्त काळ बंद राहिल्यास संस्थेला हा प्रकल्प महापालिकेस विनाअट हस्तांतरित करावा लागेल. प्रकल्पासाठी अनामत रक्कम एक लाख रुपये भरावी लागेल. दिवसाला ३०० किलो प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून इंधन तयार केले जाणार आहे. बारावे येथे बायोगॅस प्रकल्पास लागून असलेल्या जागाही एक रुपये प्रतिचौरस फूट या दराने देण्याचा पालिकेचा विचार आहे.उंबर्डे व बारावे येथे कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पर्यावरणाच्या ना हरकत दाखल्यासाठी जनसुनावणीचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सरकारला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी हरित लवादाकडे १६ जानेवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प अस्तित्वात आला, तर ६५० मेट्रीक टन कचºयापैकी ४५ टक्के प्लास्टिक कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचणार आहे. ६५० मेट्रीक टन कचºयातून ३०० मेट्रीक टन प्लास्टिक कचºयावरील प्रक्रिया सुरू होऊ शकते.१३ ठिकाणी प्रत्येकी १० टन क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प असल्याने १३० मेट्रीक टन जैव कचरा बायोगॅस प्रकल्पात जाऊ शकतो. दोन्ही प्रकल्पात ४३० मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया होऊ शकते. उरलेल्या २२० मेट्रीक टन कचºयापासून खत तयार करण्याचे महापालिकेकडून प्रस्तावित आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका