शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

ठाण्यात मराठी मतदारांच्या हाती विजयाची किल्ली; मते आपल्याकडे वळविण्यासाठी सेनेच्या दोन्ही गटांत रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 9:21 AM

ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरारोड-भाईंदर ते नवी मुंबई, बेलापूरपर्यंत विस्तारलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या २३ लाख ७ हजार २३२ एवढी होती.

- अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रथमच दोन शिवसैनिकांमध्ये सरळ लढत असल्याने या मतदारसंघातील मराठी भाषिक ५१ टक्के मते निर्णायक ठरणार आहेत. मराठी मतांचा टक्का अधिकाधिक आपल्याकडे वळविण्यासाठी शिंदेसेना आणि उद्धवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मराठी माणसाच्या हिताकरिता स्थापन झालेली शिवसेना फुटल्याने मराठी मतदार रांगा लावून मतदान करतो की, निराश होऊन घरी बसतो, हे २० मे रोजी स्पष्ट होईल. 

ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरारोड-भाईंदर ते नवी मुंबई, बेलापूरपर्यंत विस्तारलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या २३ लाख ७ हजार २३२ एवढी होती. त्यांपैकी ४९.३७ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू आहे.

शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे आणि निवडणुकीत तेच परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याने मराठी मतांचे विभाजन अटळ आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विकासकामे केली आहेत. महापालिकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता राहिली आहे. त्याचा लाभ त्यांना होईल. उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे जुने शिवसैनिक आहेत. त्यांनी खासदार निधीतून कामे केली आहेत. त्यावर त्यांची भिस्त आहे. ठाण्यातील निवडणुकीत ‘निष्ठावंत विरुद्ध गद्दार’ हाच प्रचाराचा मुद्दा आहे. मराठी मतदार या प्रचारामुळे घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पडून मतदान करतो की, मराठी माणसांची शिवसेना फुटल्यामुळे व्यथित होऊन घरात बसतो, हे मतदानाच्या दिवशी दिसेल.

मतदारांची संख्या किती ?

एकूण     २४,०९,५१३पुरुष मतदार     १३,३९,५९०महिला मतदार     ११,५०,७१६मराठी भाषक     १२,९५,०६६ उत्तर भारतीय     ५,४७,९१२मुस्लिम     २,९८,८६१गुजराती     १,७४,३७५पंजाबी, सिंधी     ४९,८१०इतर     ४९,८१४ 

टॅग्स :thane-pcठाणेrajan vichareराजन विचारेnaresh mhaskeनरेश म्हस्के