शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय, ठाणेकरांना दिला मदतीचा हात,  तातडीने हलविले सुरक्षितस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 6:07 AM

मुसळधार पावसामुळे मंगळवारी सर्वत्र दाणादाण उडालेली असताना पोलीस यंत्रणेने ठाणेकरांना मदतीचा हात दिला. पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीतील मोर्चा सांभाळून या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना दिलासा दिला.

ठाणे : मुसळधार पावसामुळे मंगळवारी सर्वत्र दाणादाण उडालेली असताना पोलीस यंत्रणेने ठाणेकरांना मदतीचा हात दिला. पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीतील मोर्चा सांभाळून या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना दिलासा दिला.राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरंग सासायटी तसेच वृंदावन सोसायटीसह आझादनगर आणि गोकुळनगरात पावसाचे पाणी तुंबले होते. राबोडी पोलीस ठाण्यासमोरही जवळपास कमरेपर्यंत पाणी साचले होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी पाणी तुंबलेल्या भागांमध्ये पोहोचून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकावर रात्री प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पावसामुळे आॅटोरिक्षा चालक प्रवाशांना घेऊन जाण्यास टाळाटाळ करीत होते. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी पथकासह रेल्वे स्थानकावर पोहोचून प्रवाशांना आॅटोरिक्षाची सोय करून दिली.कळव्यातील वाघोबा नगरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. याशिवाय घोलाई नगरात पावसामुळे सहा घरांची पडझड झाली होती. अशा स्थितीतही येथील रहिवासी घरे सोडण्यास तयार नव्हती. कळवा पोलिसांनी त्यांना समजावून आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने २0 रहिवाशांना अन्यत्र हलविले.कापूरबावडीनाका, कोलशेत, यशस्वीनगर, मनोरमानगर आणि ढोकाळी परिसरात रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे कापूरबावडीनाक्यावरून ढोकाळीकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. याशिवाय घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी झाल्याने सर्व वाहने कापूरबावडीनाक्यावरून मागे पाठविली जात होती. कापूरबावडी पोलिसांनी काही वाहने नाशिक रोडने वळविली.मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता पोलीस आयुक्तांनी अधिकाºयांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अशा बिकट परिस्थितीमध्ये पोलिसांची उपस्थिती सामान्यांसाठी दिलासादायक असते. त्याची प्रचिती मंगळवारी ठाणेकरांना आली.वाहनधारकांत सामंजस्याचा अभावचोहोकडून येणारी वाहनांची गर्दी आणि कमरेपर्यंत तुंबलेले पाणी, यामुळे कळवा नाक्यावर मंगळवारी रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अशा स्थितीत कळवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक इर्शाद सय्यद यांना अक्षरश: पोहत जाऊन वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या बाजुने वाहने आडवी घालून वाहतूक कोंडीत भर घालण्याचा प्रयत्न काही वाहनधारक करीत होते. त्यांची समजूत घालून वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न उपनिरीक्षक सय्यद यांनी केला. वाहनधारक मात्र त्यांचे ऐकण्याऐवजी वाद घालत होते. त्यामुळे या नाक्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी कायम होती.चिखलवाडीतील रहिवाशांची सुटकानौपाड्यातील चिखलवाडीत भिषण परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री ८ वाजेपर्यंत या भागातील दोन इमारतींच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरले होते. जवळपास ३0 रहिवासी या इमारतींमध्ये अडकले होते.पोलीस उपायुक्त डॉ. डि.एस. स्वामी, नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, प्रकाश पाटील, संजय धुमाळ आणि त्यांच्या पथकाने येथे मदतकार्य राबविले. पाणी एवढे तुंबले होते की, दोन शिपायांनी पोहत जाऊन रहिवाशांची सुटका केली.अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यानंतर बोटीच्या सहाय्याने काही रहिवाशांची सुटका करण्यात आली. एका इमारतीमध्ये मिश्रा कुटुंबिय दोन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि मुलांसह अडकले होते. पोलिसांनी बरीच समजूत घातल्यानंतर ते बाहेर पडण्यास तयार झाले.अत्यवस्थमहिलेला मदतसाचलेल्या पाण्यात कापूरबावडी नाक्यावरील वाहतूक कोंडी अत्यवस्थ आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाºया मानपाड्यातील महिलेची कार रस्त्यातच नादुरूस्त झाली. तिलाही पोलिसांनी लगेचच मदतीचा हात दिला.

टॅग्स :Policeपोलिस