मुरबाड : नळाद्वारे घरपोच पाणीपुरवठा करणारी तालुक्यातील चांगली योजना खांडपे ग्रामपंचायतीच्या ढिसाळपणामुळे तब्बल ९ वर्षे बंद पडली आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील खांडपे या धरणातून परिसरातील शिवळे, माल्हेड, आंबेळे तसेच सरळगाव या गावांना २४ तास पाणीपुरवठा होतो. खांडपे गावातही २००९ मध्ये ग्रामपंचायतीने पाइपलाइन टाकून नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी महावितरणने वीजमीटर बसवले होते. मात्र, याचे महावितरणने बजावलेले बिल ग्रा.पं.ने थकवले आहे. या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना धरणाशेजारील डबक्याचे पाणी प्यावे लागते. यामुळे संतापाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
खांडपे पाणीपुरवठा योजना ठप्प
By admin | Published: January 14, 2017 6:05 AM