शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टरवर होणार खरीप पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 02:43 IST

आचारसंहितेचा फटका; पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यंदाच्या खरीप हंगामाच्या कामकाजाचा आढावा सोमवारी घेऊन ६५ हजार ९०९ हेक्टरवर भात या प्रमुख पिकासह अन्य खरीप पीक लागवडीचे नियोजन केले.खरीप लागवडीच्या नियोजनासाठी दरवर्षी नियोजनभवनमध्ये खरीप लागवडीचे थाटात नियोजन केले जाते. मात्र, यंदा आचारसंहितेचा फटका त्यासही बसला आहे. पालकमंत्र्यांऐवजी येथील समिती सभागृहात कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.त्यावेळी आगामी खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले. या हंगामात हेक्टरी एक लाख ५७ हजार ९४९ मेट्रिक टन पीक उत्पादनाचा लक्ष्यांक ठरवण्यात आला आहे. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक जे.एन. भारती, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, कल्याणचे उपविभागीय कृषी अधिकारी जे.एस. बोडके, महाबीजचे पुणे विभागीय व्यवस्थापक अरविंद सोनोने, उपविभागीय व्यवस्थापक एस.एम. तेलंगेपाटील आदी कृषीचा अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.प्रति हेक्टर उत्पादकतेचा लक्ष्यांक निश्चितयावेळी माने यांनी २०१८ या मागील वर्षाच्या खरीप हंगामाचा आढावा व २०१९ या वर्षाच्या नियोजनाचे सादरीकरण या बैठकीत स्पष्ट केले. गेल्या वर्षी ५८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली असता त्याद्वारे एक लाख ४४ हजार २२९ मेट्रिक टन उत्पादन घेता आले आहे. यात भातपिकाची उत्पादकता दोन हजार ५५३ किलो प्रति हेक्टर इतकी होती. याशिवाय, नागलीचे पीक हे ८०५ किलो प्रति हेक्टर इतके झाले आहे. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. यापैकी भातपिकासाठी ५९ हजार २७९ हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तर, दोन हजार ५७८ किलो प्रति हेक्टर उत्पादकतेचा लक्ष्यांक निश्चित केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी