मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात कामगार सेनेने लावलेल्या फलकाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्या असल्या, तरी त्या कामांसाठी पालिकेतीलच अधिकारी-कर्मचारी अडवणूक करून पैसे मागत आहेत. या पार्श्वभूमीवर पैसे मागणाऱ्यांची तक्रार आयुक्त आणि कामगार संघटनेकडे करा, असे आवाहन या फलकाद्वारे केले आहे. या फलकामुळे कर्मचाºयांना त्यांच्या प्रशासकीय कामांसाठी पालिकेत पैसे मागितले जात असल्यावर एक प्रकारे हे शिक्कामोर्तब होऊ न खाऊ गिरी चव्हाट्यावर आली आहे.
महापालिका शाळेतील फरिदा कुरेशी या शिक्षिकेकडून प्रलंबित वेतनवाढीसाठी लाच घेताना उपशिक्षक असलेला अनिल आगळे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. शिवाय, पालिकेतील कंत्राटी भरती, कायम भरती, वेतनवाढ, पदोन्नती आदींसह निवृत्तीवेतन, वारसाहक्क आदी कामांसाठी वरिष्ठ अधिकाºयांची वा संबंधित विभागातील कर्मचाºयांची होणारी अर्थपूर्ण अडवणूक नेहमीची झाली आहे. काही प्रकरणांत कर्मचारी वा त्यांच्या संघटनेने तक्रारी केल्या आहेत.
महापालिका कर्मचाºयांची मुख्य संघटना असलेल्या मीरा-भाईंदर कामगार सेनेने मुख्यालयात लावलेल्या फलकामुळे पालिकेतील काही अधिकारी-कर्मचारीच पालिकेच्या कर्मचाºयांची पैशांसाठी कशी अडवणूक करतात, यावर शिक्कामोर्तब होत आहे. शिवसेनाप्रणीत कामगार सेनेने लावलेल्या फलकात काही अधिकारी आणि कर्मचारी हे १२ आणि २४ वर्षे सेवा केलेल्यांना वेतनवाढ, पेन्शन, वारस प्रकरण, घरवाटप आदी कामांसाठी पैशांची मागणी केली जात आहे, अशा तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत, असे नमूद केले आहे.या कामांसाठी कोणत्याही अधिकारी-कर्मचाºयांकडे पैसे न देता त्यांची थेट महापालिका आयुक्त वा कामगार संघटनेकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लेखी तक्रारीवर संघटनेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सरचिटणीस श्याम म्हाप्रळकर यांनी फलकाद्वारे दिला आहे.भ्रष्टाचाºयांना सोडणार नाही - म्हाप्रळकरपालिकेत कर्मचाºयांच्या विविध रास्त मागण्या आणि कामांसाठी काही अधिकारी-कर्मचाºयांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे फलकाद्वारे जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. यातून कामगार सेनेने पालिकेतील खाऊ प्रवृत्तीच उघड केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. कामगार सेनेने नुकतीच आयुक्तांसोबत बैठक घेऊन कर्मचाºयांच्या विविध मागण्या मान्य करून घेतल्या होत्या. या मागण्या मान्य होऊ नही त्यांची पूर्तता करण्यासाठी पैशांची मागणी केली जात असेल, तर मात्र भ्रष्टाचाºयांना सोडणार नाही, असे म्हाप्रळकर यांनी सांगितले.