शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत अपहरण करुन तरुणाला लुबाडले; तिघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Published: November 24, 2023 9:14 PM

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी अशरफ याच्यासह तिघांना अटक केली.

 

ठाणे: मुलीची छेड काढल्याचा बनाव करीत सर्वेशकुमार पटेल (२७, रा. इंदिरानगर, ठाणे) या तरुणाचे चाकूच्या धाकावर अपहरण करीत लुटणाऱ्या अशरफ शेख (२२), जमीर उर्फ जवा नुरुल शेख (३४) आणि झाकीर शेख (२४) या तिघांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून रिक्षा आणि मोबाईल हस्तगत केला.यातील तक्रारदार पटेल हे २० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील गोपालाश्रम हॉटेलजवळून पायी जात होते. त्याचवेळी या तिघांनी आपसात संगनमत करुन ते एका रिक्षातून त्यांच्याकडे आले. ‘तू यहाँ लडकी को छेड रहा है’, असा आरोप करीत त्यांना जबरदस्तीने रिक्षात कोंबून चाकूचा धाक दाखवला. आरडाओरडा केला तर ठार मारण्याची धमकी देत त्यांना ठाण्याच्या रघुनाथनगर भागातील एलबीएस रोड, नितीन नाका आणि लुईसवाडी परिसरात फिरवले. त्यांच्याकडून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यातून आधी आठ हजार रुपये आणि नंतर ४० हजार रुपये असे ४८ हजार रुपये ऑनलाइन यूपीआयद्वारे काढून घेतले. त्यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून रिक्षातून पळ काढला.

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी अशरफ याच्यासह तिघांना अटक केली. या तिघांनाही २९ नोव्हेबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस