मुरबाड : तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागासह सुमारे २०७ गावांच्या नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आल्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड ग्रामीण रु ग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दिला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.मुरबाडमधील सात प्राथमिक आरोग्य केंद्रे व २९ उपकेंद्रे याठिकाणी व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने पुढील उपचारासाठी रूग्णांना मुरबाड ग्रामीण रूग्णालयात धाव घ्यावी लागते. परंतु तेथे उपलब्ध असणाऱ्या सात डॉक्टरांपैकी केवळ एकच डॉक्टर कार्यरत असल्याने हे ग्रामीण रु ग्णालय सध्या प्रशासनाचे दुर्लक्षितपणामुळे बेवारस झाले आहे. एकही सफाई कर्मचारी किंवा इतर कर्मचारी उपलब्ध नसल्याने ठिकाठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी उपचारासाठी येणाºया नागरिकांना खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतींनाही तपासणी न करता थेट उल्हासनगर येथे पाठवले जाते.दरम्यान, या रूग्णालयात सकाळी ९ ते १२ पर्यंत रु ग्णावर उपचार केले जात असले तरी शुक्र वार ते सोमवार असे चारच दिवस हे रु ग्णालय सुरु ठेवले जाते. यामुळे ठिकठिकाणी होणाºया अपघातात जखमींना तसेच रात्रीअपरात्री उपचारासाठी किंवा प्रसूतीसाठी येणाºया महिलांना देखील तात्काळ उपचार मिळत नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.या आरोग्य सुविधेत आज ना उद्या सुधारणा होईल या आशेवर असणाºया आमदार कथोरे यांनाही नागरिकांच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे नागरिकांना सुरळीतपणे आरोग्य सुविधा देण्यासाठी २ डिसेंबरला रूग्णालयावर धडक देण्याचा इशारा दिला आहे.अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करणारमुरबाड ग्रामीण रु ग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मुरबाड ग्रामीण रु ग्णालयात अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक
मुरबाडमधील ग्रामीण रूग्णालयाला ठोकणार टाळे, किसन कथोरे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:25 AM