शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

किशोर पवार यांच्या कुटुंबीयांना मिळणार आर्थिक मदत, प्रस्ताव महासभेच्या पटलावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 5:16 PM

ठाण्यामध्ये पाचपाखाडी येथे झाड पडून वकील किशोर पवार यांचा अकाली मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने केली होती.

ठाणे - ठाण्यामध्ये पाचपाखाडी येथे झाड पडून वकील किशोर पवार यांचा अकाली मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने केली होती. परंतु आता पवार यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.जुलै महिन्यात पाचपाखाडी भागात सायंकाळी झाडाखाली उभ्या असलेल्या वकील किशोर पवार यांच्यावर झाड पडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेवर चांगलीच टीकेची झोड उठली होती. अनेकांनी पालिकेच्या संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी केली होती. मागील महिन्यात ठाणे मतदाता जागरण अभियानाअंतर्गत महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चाद्वारे किशोर पवार यांच्या पत्नीला नोकरीवर सामावून घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु आता येत्या महासभेत मात्र किशोर पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार किती मदत मिळणार याचा उल्लेख सध्या करण्यात आला नसला तरी महासभाच याचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. परंतु त्यांच्या पत्नीला पालिका सेवेत सामील करून घेण्याबाबतही काही लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. त्यांच्या या मागणीचा विचार होणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणे