भिवंडी: भिवंडी पोलिस परिमंडळ क्षेत्रात मोबाईल हिसकावून चोरी करण्याच्या घटना वाढल्या असतानाच कोनगाव पोलिसांनी मोबाईल जबरी चोरी करून पाळलेल्या चोरट्याला काही तासात पकडण्यात यश मिळवून त्याच्या जवळून चोरी केलेला मोबाईल व दुचाकी असा ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी सोमवारी दिली आहे.शाहरूख मोकलेख मंडल, वय २१,रा.नवीवस्ती, भिवंडी असे अटक आरोपीचे नाव आहे.
कल्याण येथील विशाल तेली हे रविवारी रात्री पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास कल्याण हुन भिवंडी च्या दिशेने दुचाकी वरून निघाले होते.कोनगाव येथील मोदी हुंदाई शोरूम समोर त्यांची दुचाकी येताच त्यांच्या मागून आलेल्या यामाह दुचाकी वरून आलेल्या अज्ञाताने विशाल तेली यांच्या खिशात ठेवलेला सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरीने खेचुन भिवंडीच्या दिशेने पलायन केले होते.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार,पोलीस निरीक्षक (गुन्हे)दिप बने यांनी तात्काळ गुन्ह्याच्या तपासा साठी चक्रे फिरवली.कोनगांव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक शेणवी व गुन्हे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वा खालील पोलीस हवालदार अरवींद गोरले, पोलिस नाईक नरेद्र पाटील,गणेश चोरगे,पोलिस शिपाई रमाकांत साळुखे या पोलिस पथकाने रांजणोली नाका येथे सापळा लावला.
आरोपीच्या वर्णनानुसार यामाह दुचाकी वरून येणाऱ्या संशयित दुचाकीस्वारास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कडे विशाल तेली यांचा चोरी केलेला मोबाईल आढळून आला. याप्रकरणी शाहरूख मोकलेख मंडल यास अटक करण्यात आली आहे.या आरोपी कडून तपासात अधिक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक शेणवी हे करीत आहेत.